किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसिडनी, (२३ मे) – पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पोहोचले. पंतप्रधान मोदींच्या तीन देशांच्या दौर्याचा हा शेवटचा मुक्काम आहे. पंतप्रधान मोदी त्यांचे ऑस्ट्रेलियन समकक्ष अँथनी अल्बानीज यांची येथे भेट घेणार आहेत. पंतप्रधान भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमालाही संबोधित करतील. पंतप्रधान मोदी २२ ते २४ मे या कालावधीत ऑस्ट्रेलियन सरकारचे पाहुणे म्हणून ऑस्ट्रेलिया दौर्यावर आहेत. ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, सिडनीला पोहोचल्यावर भारतीय समुदायाने त्यांचे मनापासून स्वागत केले. येत्या दोन दिवसात अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. पंतप्रधान मोदींनी सिडनीमध्ये उद्योग आणि गुंतवणूक कंपन्यांच्या प्रमुखांचीही भेट घेतली.
पंतप्रधान मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौर्यापूर्वी पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की, या वर्षाच्या सुरुवातीला भारतात पंतप्रधान मोदींचे खूप प्रेमळ स्वागत झाल्यामुळे त्यांचे यजमानपद भूषवण्याचा मला सन्मान वाटतो. ते म्हणाले, ऑस्ट्रेलिया आणि भारत एक स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध इंडो-पॅसिफिकसाठी वचनबद्ध आहेत. या दृष्टीकोनाला पाठिंबा देण्यासाठी आमची एकत्रित भूमिका आहे. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या या दौर्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, ज्यामध्ये समाजातील सामंजस्य आणि दोन्ही समाजांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल. चेवळ मात्र, या भेटीदरम्यान ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थक कारवायांवर चर्चा होणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होईल, असा अंदाज बांधणे योग्य नाही? पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलिया दौर्यात भारतीय समुदायाच्या लोकांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. पीएम मोदी सिडनीच्या ऑलिम्पिक पार्कमध्ये २०,००० हून अधिक भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करणार आहेत. भारतीय डायस्पोरांनी भव्य स्वागताची तयारी केली आहे. यादरम्यान, कोणत्याही चित्रपट कलाकाराप्रमाणे त्यांचे स्वागत केले जाईल.