किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलजमिनीवरील युद्ध आता समुद्रापर्यंत,
तेल अवीव, १९ मे – पॅलेस्टाईनमधील अतिरेकी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाने आता नवीन वळण घेतले आहे. सुरुवातीला दोन्ही बाजूंनी हवाई आणि जमिनीवर लढाई सुरू होती. परंतु, आता ही लढाई पाण्यात देखील सुरू झाली आहे. इस्त्रायल सैन्याने असा दावा केला आहे की, हमासने समुद्री मार्गाने त्यांच्या सतर्क सैन्यावर रिमोटद्वारे चालणार्या पाणबुडीचा वापर करून हल्ला केला असून, ही पाणबुडी बुडवण्यात आली. इस्रायलच्या लढाऊ नौका हमासच्या निशाण्यावर आहेत. या लढाईत हमासच्या अनेक सदस्यांचा मृत्यू झाला आहे, असेही इस्रायलच्या सैन्याने सांगितले.
अचूक हल्ला करण्यासाठी हमासने रिमोट कंट्रोलच्या पाणबुडीचा वापर केला, असे वृत्त इस्रायलमधील प्रसार माध्यमांनी दिले आहे. लढाईत वापरल्या जाणार्या या पाणबुड्या खूपच स्वस्त आहेत आणि ३० किमीच्या अंतरापर्यंत अचूक निशाणा साधू शकतात.
मंगळवारी सकाळी इस्त्रायल वायुदलाच्या विमानांनी हमासच्या ठिकाणांवर बॉम्ब फेकले आणि क्षेपणास्त्रेही डागली. हमासने आतापर्यंत तीन हजारांहून अधिक रॉकेट सोडले आहेत, असा दावा इस्रायलच्या सैन्याने केला आहे. इस्त्रायलनेही गाझामध्ये हमासच्या ८०० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले आहे.
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेले युद्ध आता दुसर्या आठवड्यात पोहोचले आहे. दोन्ही बाजूंच्या या संघर्षात आतापर्यंत २१२ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ६१ लहान मुलांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, १५०० पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये हमासने केलेल्या रॉकेट हल्ल्यांत दोन मुलांसह १० जण ठार झाले आहेत.
इस्त्रायल-पॅलेस्टाईन युद्धात आता लेबनॉनेही उडी घेतली आहे. लेबनॉनमधून सहा रॉकेट डागण्यात आले, असा दावा इस्रायलच्या लष्कराने जारी केलेल्या निवेदनात केला. हे सर्व रॉकेट लेबनॉनच्या हद्दीतच पडले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायली नागरिकांनी तोफा तयार केल्या आणि लेबनॉनमधील अतिरेक्यांच्या ठिकाणावर निशाणा साधला.
गाझातील एकमेव कोरोना प्रयोगशाळा उद्ध्वस्त
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा शहरातील एकमेव कोरोना चाचणी प्रयोगशाळा उद्ध्वस्त झाली आहे. प्रयोगशाळा उद्ध्वस्त झाल्यामुळे कोरोनाविरोधातील लढाईत पॅलेस्टाईनला फटका बसणार असल्याचे म्हटले जात आहे. गाझामधील अल्-रिमल क्लिनिकच्या इमारतीचा एक भाग इस्रायलच्या हवाई हल्ल्यात कोसळला. त्याशिवाय आरोग्य मंत्रालय आणि कतारच्या रेड क्रेसेंटच्या कार्यालयाचेही नुकसान झाले आहे.
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात सहा ठार
इस्रायलने बुधवारी पहाटे केलेल्या हवाई हल्ल्यात गाझा पट्टीतील किमान सहा जण ठार झाले आहेत तसेच ४० सदस्य असलेल्या एका मोठ्या कुटुंबाची इमारत या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली. हमासचे नियंत्रण असलेल्या भागातून रॉकेट हल्ले सुरूच असल्याने या परिसरात हल्ल्यांची तीव्रता वाढविण्यात आली, अशी माहिती लष्कराने दिली.
अल्-अस्तल या कुटुंबाच्या इमारतीवर हल्ला करण्यापूर्वी इस्रायलने इशारा देणारे क्षेपणास्त्र डागले होते. त्यानंतर खान युनुस शहरातील या इमारतीवर हल्ला करण्यात आला.