किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलऑस्ट्रेलियातील संशोधकांचे दिलासादायक संशोधन,
क्वीन्सलॅण्ड, १८ मे – ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलॅण्ड येथील मेन्झीस आरोग्य संस्थेच्या संशोधकांनी अशा एका थेरेपीचा शोध लावला आहे, ज्यामुळे शरीरातील कोरोनाच्या विषाणूचा ९९.९० टक्के नाश होतो. ‘जीन सायलेन्सिंग’ असे या थेरेपीचे नाव असून, ती एखाद्या क्षेपणास्त्राप्रमाणे काम करते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. या संशोधनात सहभागी असलेले प्रा. निगेल मॅकमिलन यांनी सांगितले की, ही थेरेपी शरिरातील कोरोनाच्या विषाणूची ओळख पटवून त्यांच्यावर हल्ला करते. यामुळे संसर्ग फैलण्यास अटकाव होतो आणि मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.
ही थेरेपी ‘जीन सायलेन्सिंग’ या वैद्यकीय तंत्रावर आधारित आहे. हे तंत्र श्वसन रोगावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. हे एक तंत्र असून ‘आरएनए’च्या लहान तुकड्यांसह काम करते, असे मॅकमिलन म्हणाले. या उपचार पद्धतीमुळे विषाणूच्या जीनोमला अटकाव होतो. त्यामुळे संसर्ग नियंत्रणात राहातो. या उपचारामुळे कोरोनाच्या विषाणूचा मूळापासून खात्मा होत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपचार कसे होतात
नॅनोपार्टिकल इंजेक्शनद्वारे हे औषध रक्ताच्या प्रवाहात सोडले जाते. नॅनोपार्टिकल्स फुफ्फुसात प्रवेश करतात आणि पेशींमध्ये मिसळतात. त्यानंतर ‘आरएनए’द्वारे विषाणूची ओळख पटवली जाते आणि त्याचा जीनोम ते विषाणू नष्ट करतात. मागील वर्षभरापासून या उपचार पद्धतीवर काम सुरू असल्याचे मॅकमिलन यांनी सांगितले.