किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, १८ मे – इस्रायलने पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासच्या तळांवर जबरदस्त हवाई हल्ले सुरू केल्याने आज जगात याच विषयावर प्रामुख्याने चर्चा होत आहे. मात्र, इस्रायल व पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्षाला ७० वर्षांचा इतिहास आहे. या दोन देशांमधील वादाचे कारण जाणून घेणे उद्बोधक ठरेल.
कधी सुरू झाला वाद?
पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याचा पराभव झाला. यानंतर ब्रिटनने पॅलेस्टाईनचा ताबा घेतला. ही जमीन प्रामुख्याने अरब आणि ज्यू लोकांच्या ताब्यात होती. येथे अरब लोक बहुसंख्य होते. हळूहळू अरब आणि ज्यू लोकांमध्ये तणाव वाढू लागला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने पॅलेस्टाईनमधील ज्यू लोकांनी घरे स्थापित करण्यासाठी ब्रिटनला जबाबदार धरले.
छळामुळे ज्यू नागरिक पॅलेस्टाईनमध्ये दाखल
१९२० ते १९४० दरम्यान मोठ्या संख्येने ज्यू नागरिक पॅलेस्टाईनमध्ये येऊ लागले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यूंना युरोपमध्ये छळ सहन करावा लागत होता. दुसरे कारण म्हणजे, युद्धानंतर ज्यू लोकांना स्थलांतर करून नवीन घरे बांधून आपली वस्ती तयार करायची होती. यामुळे हे नागरिक युरोपहून पॅलेस्टाईनकडे जाऊ लागले. मात्र, पॅलेस्टाईनमध्ये ज्यू, अरब आणि ब्रिटिश यांच्यात वाद वाढू लागला.
१९४७ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाईनला ज्यू आणि अरब राज्यात विभाजित करण्याची घोषणा केली. जेरुसलेमला आंतरराष्ट्रीय शहर बनवले गेले. याला ज्यू नेत्यांनी मान्यता दिली. परंतु, अरबांनी कधीही ही गोष्ट स्वीकारली नाही अथवा अंमलात आणली नाही.
कशी झाली इस्रायलची निर्मिती?
१९४८ मध्ये ब्रिटनने पॅलेस्टाईनवरील ताबा सोडला आणि ज्यू नेत्यांनी इस्रायलच्या निर्मितीची घोषणा केली. पॅलेस्टाईनच्या जनतेने याला विरोध केला आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी युद्ध झाले. या युद्धादरम्यान सभोवतालच्या मुस्लिम देशांनी इस्रायलवर हल्ला केला. मात्र, इस्रायलने या सर्वांचा दणकून पराभव केला. यामुळे लाखो पॅलेस्टिनी आपल्या घरातून पळून गेले.
पॅलेस्टाईन नागरिक याला ‘अल नकबा’ किंवा ‘आपदा’ म्हणून आठवणीत ठेवू लागले. १९४९ मध्ये युद्धाचा अंत झाला आणि युद्धबंदीची घोषणा करण्यात आली. त्याच वेळी, युद्धानंतर जॉर्डनच्या ताब्यात घेतलेली जमीन वेस्ट बँक आणि इजिप्त-व्याप्त जागा गाझा म्हणून ओळखली जात होती. त्यानंतर जेरुसलेम पश्चिम आणि पूर्वेकडून जॉर्डन आणि इस्रायलमध्ये विभागला गेला. या संघर्षाचा त्वरित अंत होऊ शकत नाही किंवा कोणताही तोडगा निघू शकत नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराचा प्रस्ताव दिला होता. परंतु, पॅलेस्टाईननी ती योजना एकतर्फी आणि इस्रायलच्या बाजूने असल्याचे सांगून नाकारली.