किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– अधिक शक्तिशाली पावले उचलण्याचा इशारा,
सेऊल, (१९ फेब्रुवारी ) – प्रतिस्पर्धी देशांविरुद्ध घातक आण्विक आक्रमणाची क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी नवीनतम आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे, असे उत्तर कोरियाने रविवारी सांगितले. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने अलिकडेच संयुक्तपणे केलेल्या लष्करी प्रशिक्षणाच्या पृष्ठभूमीवर अधिक शक्तिशाली पावले उचलणार असल्याचा इशाराही उत्तर कोरियाने दिला आहे.
शनिवारची आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी ही १ जानेवारीनंतरची उत्तर कोरियाची पहिली क्षेपणास्त्र चाचणी आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने केलेल्या संयुक्त युद्ध सरावाला उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन हे आपल्या देशाची आण्विक क्षमता वाढवण्याची संधी म्हणून वापरत आहे. उत्तर कोरिया आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी नियमितपणे करू शकतो, असे एका तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
नेता किम जोंग ऊन यांच्या थेट आदेशानुसार पूर्वसूचना न देता आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणी अचानक करण्यात आली, असे उत्तर कोरियाच्या अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने (केसीएनए) म्हटले आहे. क्षेपणास्त्राची विश्वासार्हता व देशाच्या आण्विक शक्तीची लढाऊ तयारी तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात आली असल्याचे केसीएनने म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र कोरियन द्वीपकल्प व जपानदरम्यानच्या पाण्यात उच्च कोनात सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राने सुमारे ५७७० किलोमीटरची (३५८५ मैल) कमाल उंची गाठली व ६७ मिनिटांच्या उड्डाणात सुमारे ९९० किलोमीटर (६१५ मैल) अंतर पार केले.