किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-हरीत उद्योगाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल,
मेलबर्न, (१९ फेब्रुवारी ) – पुढील काळ हरीत इंधनाचा आहे. यात हायड्रोजन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मात्र, हा वायू अतिशय स्वस्तात विकसित झाल्यास या हरीत इंधनाला चालना मिळेल. आता थेट समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्याची अतिशय स्वस्त आणि अधिक ऊर्जा-कार्यक्षम पद्धत विकसित करीत, खर्या अर्थाने हरीत हायड्रोजन उद्योगाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.
ही पद्धत आरएमआयटी विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केली आहे. या पद्धतीनुसार समुद्राचे पाणी थेट हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजित केले जाते. यात विलवणीकरणाची तसेच त्याच्याशी संबंधित खर्च, ऊर्जेचा वापराची गरज नाही तसेच कार्बन उत्सर्जनही होत नाही. दीर्घकाळापासून हायड्रोजनकडे भविष्यातील स्वच्छ इंधन आणि ऊर्जाविषयक गंभीर आव्हानांसाठी संभाव्य उपाय म्हणून पाहिले जात आहे. जगातील जवळपास सर्व हायड्रोजन सध्या जीवाश्म इंधनापासून तयार होते आणि त्याची निर्मिती करताना जवळपास ८३ कोटी टन कार्बनडाय ऑक्साईड वातावरणात सोडला जातो.
‘‘समुद्राच्या पाण्यापासून थेट हायड्रोजन करण्याची आमची पद्धत सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही हरीत हायड्रोजन तयार करण्याच्या पद्धतीच्या तुलनेत अत्यंत सोपी आणि किफायतशीर आहे.’’
डॉ. नासिर महमूद, आरएमआयटी विद्यापीठातील प्रमुख संशोधक
असा तयार होतो हरीत हायड्रोजन
हरीत हायड्रोजन तयार करण्यासाठी इलेक्ट्रोलायझरचा वापर करण्यात येतो. पाण्यात विद्युत प्रवाह पाठवण्यासाठी इलेक्ट्रोलायझरचा वापर करून हायड्रोजन आणि ऑक्सिजन या घटकांचे विभाजन केले जाते. हे इलेक्ट्रोलायझर्स सध्या महागडे उत्प्रेरके (कॅटॅलिस्ट) वापरतात. एक किलो हायड्रोजन तयार करण्यासाठी ते सुमारे नऊ लिटर लागू शकतात. त्यातून कार्बनडाय ऑक्साईड नाही, पण क्लोरीनसारखे विषारी घटक निघू शकतात.
ठळक मुद्दे
– समुद्राच्या पाण्यापासून हायड्रोजनची निर्मिती करताना क्लोरीनचीही निर्मिती
– ही अडचण न सोडवल्यास दरवर्षी २४ कोटी टन क्लोरीनची निर्मिती
– नव्या पद्धतीत कार्बनचे उत्सर्जन तसेच क्लोरिन तयार होत नाही
– नव्या पद्धतीसाठी विशेष कॅटॅलिस्टचा वापर
– नवीन कॅटॅलिस्टसाठी कमी ऊर्जेचा वापर
– एक किलो हायड्रोजनसाठी दोन डॉलर्सचा खर्च