किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– किरणांची दाहकता कमी करण्याचा अद्भुत प्रयोग,
वॉशिंग्टन, (२० फेब्रुवारी ) – सध्या संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली असून, ती म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग अर्थात् वातावरणातील बदल. दिवसेंदिवस सूर्याने आग ओकण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. त्यामुळेच या जगन्मित्राला काही प्रमाणात शीतल म्हणजेच थंड करण्यासाठी अमेरिकेतील शास्त्रज्ञांचा एक गट पुढे सरसावला आहे. मात्र, यात सुद्धा दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. काही शास्त्रज्ञांनी या अभिनव प्रयोगाला विरोध केला आहे. त्यांच्या मते, असे धाडस पृथ्वीसाठी धोकादायक आणि विनाशकारी ठरू शकते. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी एक विचित्र मार्ग शोधला आहे.
शास्त्रज्ञ एका यंत्राच्या साहाय्याने सूर्याची पृथ्वीवर येणारी उष्णता आणि सूर्यप्रकाश कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या यंत्रामुळे किमान सूर्यप्रकाश पृथ्वीवर येईल. याबाबत सध्या संशोधन सुरू असून, या प्रकल्पावर आतापर्यंत मोठी गुंतवणूक झाली आहे. सूर्यप्रकाश आणि उष्णता घटविण्याच्या प्रकल्पावर काम सुरू आहे. सूर्याची उष्णता कमी झाल्यास पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंगविरुद्धच्या मोहिमेत मोठे यश मिळेल, असा या शास्त्रज्ञांचा दावा आहे.
प्रकल्पाबाबत धोक्याचा इशारा
सूर्याची उष्णता कमी करण्याच्या या प्रकल्पामध्ये मोठी गुंतवणूक झाल्याने आता या प्रकरणाच्या चर्चेलाही उधाण आले आहे. सूर्यप्रकाश कमी करण्याच्या या संशोधनाला शास्त्रज्ञांनी सोलर जिओ इंजिनीअरिंग असे म्हटले आहे. याबाबतच्या सर्व संभाव्य धोक्यांबाबत काही शास्त्रज्ञांनी इशारा दिल्यानंतरही यावर काम करणारे शास्त्रज्ञ हा प्रकल्प थांबवण्याच्या विचारात नाहीत. ते आपल्या मतांवर आणि कृतीवर ठाम आहेत.
अशी सुचली कल्पना
जून १९९१ मध्ये फिलिपाईन्समधील माऊंट पिनेताबू या ज्वालामुखीचा उद्रेक झाला. २० व्या शतकातील या सर्वांत मोठ्या स्फोटातून पसरलेली राख आकाशात सुमारे २८ मैल परिघात पसरली. यानंतर पुढील १५ महिने संपूर्ण जगाचे तापमान सुमारे १ अंशाने कमी झाले होते. वातावरणातील राखेमुळे सूर्याची किरणे पूर्णपणे पृथ्वीवर पोहोचू शकत नव्हती. यातूनच शास्त्रज्ञांना नवी कल्पना सुचली. सूर्य आणि वातावरण यांच्यात एखाद्या गोष्टीचा थर उभा राहिल्यास सूर्याची किरणे पूर्ण शक्तीने पृथ्वीपर्यंत पोहोचणार नाहीत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
दाह कसा कमी होईल?
सोलर जिओ इंजिनीअरिंग म्हणून ओळखल्या जाणार्या या प्रकि‘येत शास्त्रज्ञ मोठ्या फुग्यांद्वारे पृथ्वीबाहेरील वातावरणाच्या वरच्या भागावर सल्फर डायऑक्साईडची फवारणी करतील. सूर्यकिरणांना परावर्तित करणारे आगळे गुणधर्म शास्त्रज्ञांना सल्फरमध्ये आढळले आहेत. त्यामुळे सल्फर डायऑक्साईडचा पडदा सूर्यकिरण आणि पृथ्वी यांच्यात उभा केल्यास सूर्याचा दाह कमी होईल, असे शास्त्रज्ञांना वाटते. या प्रकल्पांतर्गत पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरावर सल्फरची फवारणी केली जाणार आहे. सल्फरचा थर सूर्याच्या किरणांना परावर्तित करून पुन्हा अंतराळात पाठवेल. परिणामी, सूर्यप्रकाश त्याच्या संपूर्ण उष्णतेसह पृथ्वीवर पोहोचू शकणार नाही; मग पृथ्वीवरील वाढते तापमान आपोआपच नियंत्रणात येईल. या नव्या प्रयोगामुळे ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यास चांगली मदत होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. त्यामुळेच त्यांना या प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक मिळाली असून, प्रकल्पाचे काम झपाट्याने सुरू आहे.