किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलसिंगापूर, ५ डिसेंबर – जगातील सर्वांत मोठी लस उत्पादक संस्था सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना ‘एशियन्स ऑफ द इयर’च्या यादीत पहिल्या सहा लोकांमध्ये स्थान मिळाले आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. जगभरात थैमान घालत असेलेल्या कोरोना महामारीवर सुरू असलेल्या त्यांच्या लसनिर्मिती कार्याला मिळालेली ही पोचपावती आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटीश-स्वीडिश औषधनिर्माण संस्था ऍस्ट्राझेनका यांच्या सहकार्याने ‘कोविडशील्ड’ ही लस तयार केली. भारतभर या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. या यादीत इतर पाच जणांमध्ये चिनी संशोधक झांग योंगझेन आहेत, ज्यांनी सार्स-सीओव्ही -२ या विषाणूसंबंधी संशोधन केले आहे. याच विषाणूमुळे साथीचा रोग पसरला. यासह विषाणूविरुद्ध लस निर्मितीच्या बाबतीत आघाडीवर असलेले चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुयुची मोरिशिता आणि सिंगापूरचे प्रोफेसर ओई इंजिन योंग यांचा देखील यात समावेश आहे. दक्षिण कोरियन उद्योजक सीओ जंग-जिन यांनी देखील या यादीत स्थान पटकाविले आहे. एकत्रितपणे या सर्वांना ‘विषाणू विनाशक’ म्हणून संबोधले गेले आहे. कोरोना महामारीच्या काळात उपाययोजना करण्यात या सर्वांनी स्वतःला झोकून दिले आहे. १९६६ साली सायरस पूनावाला यांनी सीरम संस्थेची स्थापन केली होती. त्यानंतर आता अवघ्या ३९ वर्षांच्या वयात अदर पूनावाला यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर नाव कमविले आहे.
आम्ही आपल्या धैर्याला, काळजी, बांधिलकी आणि सर्जनशीलतेला सलाम करतो. संकटाच्या या काळात तुम्ही आशियाच नव्हे, तर जगाच्या आशेचे प्रतीक आहात, यात म्हटले आहे.