किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलप्रवाशांना मोठा दिलासा,
मेलबॉर्न, १ नोव्हेंबर – ऑस्ट्रेलियन सरकारने आज सोमवारी भारतीय कोरोना प्रतिबंधक लस कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. देशातील लसीकरण मोहिमेत भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि ऍस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोव्हिशिल्ड लसीचा वापर केला जात आहे. कोव्हॅक्सिन ही संपूर्ण स्वदेशी लस करून, भारतातील लसीकरणात या लसीची महत्त्वाची भूमिका आहे.
भारतातील कोव्हॅक्सिन आणि चीनमधील बीबीआयबीपी-कोरव्ही या दोन लसी घेतलेल्या वर्षांवरील प्रवाशांना ऑस्ट्रेलियात प्रवेश देण्याचा निर्णय उपचारात्मक वस्तू प्रशासनाने (टीजीए) घेतला आहे, अशी माहिती टीजीएने ट्विटरवर दिली. या निर्णयामुळे कोव्हॅक्सिन घेतलेल्या १२ वर्षांवरील आणि बीबीआयबीपी-कोरव्ही घेतलेल्या १८ ते ६० वयोगटातील प्रवाशांचा ऑस्ट्रेलियातील प्रवेश प्रशस्त झाला आहे.
या लसींपासून मिळणार्या संरक्षणाबाबतची माहिती टीजीएने काही आठवड्यांपूर्वी मागितली होती. लसीकरण झालेल्या प्रवाशांमुळे ऑस्ट्रेलियात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होत असल्याने ऑस्ट्रेलियन प्रशासनाने ही मान्यता दिली आहे. लस प्रायोजक किंवा जागतिक आरोग्य संघटनेने टीजीएला पूरक माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलियन सरकारने प्रवाशांच्या लशीकरणाबाबतची योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मंजुरी दिली आहे, असे ट्विट ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओफेरेल एओ यांनी केले.