किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादललष्करप्रमुखांवर टीका करणे पडले महागात,
इस्लामाबाद, ३० ऑक्टोबर – पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या विरोधात पत्र लिहिल्याबद्दल आणि ते वरिष्ठ लष्करी अधिकार्यांना पाठवल्याबद्दल पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने माजी मेजर जनरलच्या मुलाला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
हसन अस्करी या संगणक अभियंत्याने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लिहिलेल्या पत्रात जनरल बाजवा यांच्या लष्करप्रमुखपदाच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीवर आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली होती आणि त्यांना पायउतार होण्यास सांगितले होते.
अस्करी यांनी त्यांच्या पत्राच्या प्रती विविध मेजर जनरल आणि लेफ्टनंट जनरलना पाठवल्या होत्या. त्याचे वडील जफर महदी अस्करी यांनी पाकिस्तानी लष्करात जनरल म्हणून काम केले आहे. अस्करी यांच्यावर लष्करी अधिकार्यांना सर्वोच्च कमांडच्या विरोधात भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. जुलैमध्ये त्याला फील्ड जनरल कोर्ट मार्शलने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती.
गुजरनवाला छावणी येथे त्यांच्या खटल्याची सुनावणी झाली आणि दोषी ठरल्यानंतर त्याला साहिवाल येथील उच्च सुरक्षा तुरुंगात पाठवण्यात आले. जनरल बाजवा यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे, असे हसनने पत्रात म्हटले होते. त्यांनी तातडीने पद न सोडल्यास लष्करात चुकीचा संदेश जाईल आणि चुकीची परंपरा प्रस्थापित होईल, असे हसन म्हणाले होते. पाकिस्तानी लष्कर किंवा इतर विभागांनी लष्करी अधिकारी आणि त्यांच्या मुलाविरुद्धच्या खटल्याबाबत कोणतीही माहिती दिलेले नव्हती.
यासंदर्भात लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर ही बाब समोर आली. हसनचे वडील जफर मेहदी अस्करी हे स्वतः पाकिस्तानी लष्करात जनरल राहिले आहेत. त्याच्या मदतीने हसनने या पत्राची प्रत लष्करातील काही सेवेत असलेल्या अधिकार्यांना पाठवल्याचा आरोप आहे.