किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमेलबर्न, (२५ एप्रिल) – ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे एका व्यासपीठावर जमलेल्या सर्व धर्माच्या नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले. भारतातील आंतरधर्मीय सौहार्दाच्या परिस्थितीबद्दल या लोकांनी पंतप्रधान मोदींवर विशेष स्तुतिसुमने उधळली. एनआयडी फाऊंडेशनच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात फाऊंडेशनचे मुख्य संरक्षक सतनाम सिंग संधू, ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त राजदूत मनप्रीत वोहरा, अँग्लिकन चर्च ऑफ ऑस्ट्रेलियाचे बिशप फिलिप जेम्स हगिन्स, व्हिक्टोरियातील अहमदिया मुस्लिम समुदायाचे सदस्य डॉ. तारिक बट आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी ऑस्ट्रेलियातील खासदार जेसन वुड म्हणाले की, सर्व धर्मगुरूंशी शांतता आणि सौहार्दबाबत एका सुरात बोलणे चांगले वाटले. जगभरात सकारात्मक संदेश पाठवणारे धार्मिक नेते असणे महत्त्वाचे आहे.
सतनामसिंग संधू यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शीख समुदायासाठी केलेले कार्य आणि त्यांच्या योगदानावर आधारित ‘हार्टफेल्ट लेगसी टू द फेथ’ हे पुस्तक उपस्थित सर्व मान्यवरांना भेट दिले. प्रगतिशील आणि धर्मनिरपेक्ष असल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. संधू म्हणाले की, विविध समुदाय आणि धर्माचे लोक शतकानुशतके भारतात राहतात आणि सर्वांचा जातीय सलो‘यावर विश्वास आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर वेगाने वाटचाल केली आहे तसेच जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली. इतर अनेक देशांप्रमाणे भारतातील सर्व समुदायांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यांना जात, पात, धर्म असा कोणताही भेदभाव न करता सर्व प्रकारच्या संधी दिल्या जातात. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालीही सर्वांना सुरक्षित वाटत आहे.
व्हिक्टोरियातील अहमदिया मुस्लिम समुदायाचे सदस्य डॉ. तारिक बट म्हणाले की, हा कार्यक्रम आयोजित करून चांगला पुढाकार घेतला गेला आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजाला एकत्र आणण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. मूळचे पाकिस्तानचे रहिवासी असलेले आणि आता ऑस्ट्रेलियात वास्तव्याला असलेले बट म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्भावना आणि शांततेला प्रोत्साहन देऊन आणि सर्व समुदायांना एकत्र येण्यासाठी प्रोत्साहित करून चांगलेच काम करीत आहेत. मोदींकडे असा करिष्मा आहे की, लोक त्यांच्या धार्मिकतेची पर्वा न करता त्यांचे अनुसरण करीत आहेत आणि ही चांगली बाब आहे.