किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– पाकिस्तानी ब्लॅागरचे पंतप्रधान मोदींना आवाहन,
– भारतीय हद्दीतील काश्मीर नशीबवान असल्याची भावना,
इस्लामाबाद, (२५ एप्रिल) – भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये अनेकवेळा काश्मीर मुद्यावरून वाद होत असतात. व्याप्त काश्मीरबाबत जागतिक पातळीवर चर्चा होत असते. सध्या एका पाकिस्तानी ब्लॉगरचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पाकिस्तान भाडेपट्ट्यावर किंवा दत्तक घेण्याची विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करताना दिसत आहे.
तारिक भट या ट्विटर अकाऊंटवरून या पाकिस्तानी ब्लॉगरचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आले की, पाकिस्तानी ब्लॉगर आणि बिझनेस टायकूनने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तान भाडेपट्ट्यावर घेण्याची विनंती केली. भारतीय हद्दीतील काश्मीर हे नशीबवान असल्याची भावना या युट्यूबवरून व्यक्त केली आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नरेंद्र मोदी यांना टॅग देखील करण्यात आले आहे.
काय म्हणतो पाकिस्तानी ब्लॉगर?
व्हायरल व्हिडीओमध्ये पाकिस्तानी ब्लॉगर म्हणतो, काश्मीर हे अशा देशात आहे, जो देश लवकरच जगावर राज्य करेल. भारत हा देश अमेरिका, ब्रिटनच नव्हे तर, जगाचे नेतृत्व करीत आहे. व्यापार, आयटी क्षेत्र, उत्पादकता या सर्व गोष्टींबद्दल भारत सध्या विचार करीत आहे, पण आपला देश हा बिर्याणीची, कबाबची चव अजून चविष्ट कशी करावी, अशा गोष्टींचा विचार करण्यात व्यस्त आहे.
मोदीजींनी आम्हाला दत्तक घ्यावे. भारताचा पासपोर्ट पाहा, त्यांची अर्थव्यवस्था पाहा. मात्र, आपले लोक, ’कश्मीर बनेगा पाकिस्तान’ असा विचार करीत बसले आहेत. पाकिस्तानमधील लोक तसेच येथील सरकार गरीब आहे. श्रीमंतांकडून मदत घ्यायची असल्याने गरीब नेहमी श्रीमंतांसोबत मैत्री करतात. पाकिस्तानी ब्लॉगरचा हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत चार हजारांपेक्षा जास्त नेटकर्यांनी पाहिला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कॉमेंट्सही केल्या आहेत.