किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलकराची, २५ डिसेंबर – इंडियन एअरलाईन्सच्या १९९९ मधील विमान अपहरणात सहभागी असलेला अल् कायदाचा अतिरेकी अहमद ओमर सईद शेख आणि त्याच्या तीन साथीदारांची तत्काळ सुटका करण्याचा आदेश सिंध उच्च न्यायालयाने दिला असून, त्यानुसार, या सर्वांची उद्या शनिवारी सुटका करण्यात येणार आहे. अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लच्या हत्येतही शेखचा सहभाग होता.
अहमद उमर शेख, फहाद नसीम, सईद सलमान साकिब आणि शेख मोहम्मद आदिल अशी या अतिरेक्यांची नावे आहेत. पर्ल हत्याकांड प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे. डॅनियल पर्ल हे वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशिया ब्युरोचे प्रमुख होते. या अतिरेक्यांची सुटका करण्याचा आमचा आदेश असला, तरी त्यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी नसल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.
उमर शेख व इतर अतिरेक्यांच्या सुटकेमागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेखला सुरुवातीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ती बदलून त्याला सात वर्षांचा कारावास आणि २० लाखांचा दंड ठोठावला होता. शेखने १८ वर्षे तुरुंगात काढली असल्यामुळे त्याच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण झाला असून, आता त्यांना तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. उमर शेखला सोडण्याचा आदेश तीन वर्षांपूर्वीच देण्यात आला होता, पण आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तान सरकारने दहशतवादविरोधी कायद्यानुसार तुरुंगात ठेवले होते.
आयएसआयच्या कटाचा भाग
उमर शेख व इतर अतिरेक्यांची सुटका करणे हा आयएसआयच्या कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत असल्याने, हा देश तूर्तास इतर देशांमध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे आयएसआयला वाटते. उमर शेखचा वापर आता भारताविरोधात कारवायांसाठी करता येईल, असा आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराचा डाव असल्याचे मानले जात आहे.