किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलवॉशिंग्टन, २४ डिसेंबर – पुढच्या वर्षी कोरोनाविरोधातील लस उपलब्ध होईल अशी आशा आहे. वर्षअखेर थोडाफार का होईना, दिलासा मिळाला. मात्र आता नव्या कोरोनाचं संकट ओढवलं आहे. लस येताच कोरोनानं आपलं रूप बदललं आणि मग कोरोनाविरोधातील लस या नव्या कोरोनावर प्रभावी ठरेल का असा प्रश्न निर्माण झाला. पण, ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूविरोधात अमेरिकेची कोरोना लस प्रभावी आहे, असा दावा अमेरिकेतील औषध कंपनीने केला आहे.
अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने तयार केलेली कोरोना लस ही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधातही प्रभावी आहे असा दावा मॉडर्ना कंपनीने केला आहे. मॉडर्ना कंपनीच्या लसीला अमरिकेत आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही लस नव्या कोरोनापासूनही संरक्षण देईल असा विश्वास कंपनीला आहे. याचा पुरावा देण्यासाठी कंपनी चाचणीही करणार आहे. पुढील काही आठवड्यात ही चाचणी होईल होईल, असे वृत्त आहे.
याआधी सुरू असलेल्या क्लिनिक चाचणीनुसार कंपनीने ही लस लक्षणं न दिसणार्या कोरोना रुग्णांवर देखील प्रभावी ठरणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या लसीचा एक डोस या रुग्णांना पुरेसा ठरणार असून एका लसीमध्येच त्यांना फायदा मिळणार आहे. ही लस घेतल्यानंतर शरीरामध्ये ३ महिने अँटीबॉडीज राहत असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
ब्रिटनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूची प्रकरणं वाढू लागली आणि याचं कारण म्हणजे कोरोनाचं नवं रूप असल्याचं सांगितलं जात आहे. फक्त ब्रिटनच नाही तर इतर काही देशांमध्येही हा स्ट्रेन दिसून आला आहे. नवा कोरोना अधिक संसर्गजन्य आहे. पण, कोरोना विषाणूमधील हा बदल गंभीर आजार निर्माण करणारा नाही किंवा त्यामुळे मृत्यूचा धोका अधिक आहे असं नाही, हे भारताच्या आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.