किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकोलंबिया, (०९ सप्टेंबर) – कॅनडातील भारतीय दूतावास बंद करण्याची धमकी देण्याच्या एक दिवस आधी ब्रिटिश कोलंबियाच्या सरे शहरातील आणखी एका हिंदू मंदिराची खलिस्तानी समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. याशिवाय मंदिराच्या बाहेरील भिंतीवर मोदींविरुद्ध आणि पंजाबविरुद्ध संदेश लिहीत विटंबना करण्यात आली आहे. गुरुवार, ७ सप्टेंबर रोजी पहाटे ही घटना समोर आली आहे. या घटनेची नोंद रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस आणि आरसीएमपीमध्ये करण्यात आली आहे. सोशल मीडियावर यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
गेल्या मे महिन्यापासून ब्रिटीश कोलंबिया आणि ग्रेटर टोरांटो परिसरातील हिंदू मंदिरांना खलिस्तानी समर्थकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तांनी जागतिक घडामोडींच्या पृष्ठभूमीवर कॅनडाला त्यांच्या परिसरातील संभाव्य धोक्यांबद्दल सावध केल्यानंतर बि‘टिश कोलंबियाच्या सरे शहरातील श्री माता भामेश्वरी दुर्गा मंदिराची विटंबना करण्यात आली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या ट्वीटमध्ये मंदिराच्या भिंतींवर पंतप्रधान मोदी तसेच भारताविरोधी संदेश रेखाटण्यात आले आहेत. कॅनडाच्या बि‘टिश कोलंबियामधील सरे येथील हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याची ही दुसरी घटना आहे.
खलिस्तान समर्थक घटकांनी शुक्रवारी व्हँकुव्हर वाणिज्य दूतावास बंद करण्याचे आवाहन केले होते. तसेच कॅनडातील एका शाळेत १० सप्टेंबर रोजी तथाकथित खलिस्तान सार्वमत कार्यक्रम रद्द केल्याच्या पृष्ठभूमीवर हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु शाळेच्या मंडळाने म्हटले की, शाळा समुदाय कार्यासाठी भाड्याने देण्यात येते. मात्र, त्यांच्याकडून शाळेच्या भाडे कराराचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यासोबतचा करार रद्द करण्यात आला आहे. कारण, त्यांनी जाहिरातींमध्ये शाळेच्या छायाचित्रांसह एके-४७ रायफल आणि सेबर दाखवण्यात आल्याचा आरोप शाळेच्या मंडळाने केला आहे.