किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– वापरला व्हेटो,
कॅलिफोर्निया, (०८ ऑक्टोबर) – अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात जातिभेद विरोधाचे नाव देऊन प्रत्यक्षात हिंदूविरोधी कायदा संमत करणार्या विधेयकाला कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी आपल्या अधिकारातला नकाराधिकार अर्थात व्हेटो वापरून रोखले. एसबी-४०३ हे विधेयक कॅलिफोर्निया राज्याच्या विधिमंडळाने मार्च २०२३ मध्येच संमत केले होते हिंदू धर्मातील विशिष्ट प्रथा-परंपरा या भेदभाव करणार्या आहेत, असा दावा करून संपूर्ण हिंदू धर्मालाच या विधेयकात बदनाम करण्यात आले होते. हिंदूंच्या धार्मिक प्रथा भेदभाव करणार्या आहेत, असे अत्यंत चलाखीने या विधेयकात सूचित करण्यात आले होते.
या विधेयकाची सर्व भाषा भेदभाव विरोधाची होती, ती हिंदू धर्म आणि दक्षिण आशियाई हिंदू समाज यांच्याविषयी प्रचंड गैरसमज निर्माण करणारी होती. त्यामुळे अमेरिकन हिंदू फाऊंडेशनने या विधेयकाच्या विरोधात कॅलिफोर्निया राज्यात मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन गव्हर्नर गॅव्हिन न्यूसम यांनी आपला व्हेटो वापरून एसबी-४०३ हे विधेयक रोखले. कॅलिफोर्निया राज्यामध्ये आधीच लिंग, वंश, रंग, धर्म, राष्ट्रीय मूळ, विकलांगता, लैंगिक ओळख अथवा लैंगिक कल त्याचबरोबर अन्य आधारांवरचे भेदभाव रोखणारे कायदे आधीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे त्यासाठी कोणत्याही नव्या कायद्याची गरज नाही. म्हणून आपण एसबी-४०३ नावाने ओळखल्या जाणार्या विधेयकावर स्वाक्षरी करीत नाही, तर व्हेटो वापरतो, असे गॅव्हिन न्यूसम यांनी स्पष्ट केले.
न्यूसम यांनी एसबी-४०३ विधेयक व्हेटो वापरून रोखल्याबद्दल हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने समाधान व्यक्त केले आहे. संबंधित विधेयकात हिंदू धर्माला भेदभावी ठरविण्याची चलाख भाषा वापरण्यात आली होती. त्यातून हिंदू प्रथा-परंपरा बदनाम होत होत्याच, पण त्या पलीकडे जाऊन कॅलिफोर्नियामध्ये दक्षिण आशियातील नागरिकांवर अनावश्यक संशय निर्माण होऊन त्यांच्याविषयीचा भेदभाव निर्माण होत होता. संबंधित विधेयक तयार करताना त्यासाठी बनावट जात सर्वेक्षणाचा आधार घेण्यात आला होता. त्यातून कॅलिफोर्नियातल्या दक्षिण आशियाई नागरिकांचे हक्क हिरावले जात होते. मात्र आता एसबी-४०३ हे विधेयक रोखल्याने कॅलिफोर्निया नवा भेदभाव तयार होऊ शकणार नाही. त्याचबरोबर समतेच्या तथाकथित प्रयोगशाळेतून निघालेले हिंदू धर्माच्या बदनामीचे षडयंत्र उद्ध्वस्त केले जाईल, असा विश्वास हिंदू अमेरिकन फाऊंडेशनचे प्रमुख समीर कालरा यांनी व्यक्त केला. अमेरिका हा कोणत्याही प्रकारचा भेदभाव सहन न करणारा देश आहे तो तसाच राहावा आणि सर्वांचे सहजीवन अधिक संपन्न व्हावे. यात नवा भेदभावही तयार होऊ नये, अशी भावना कालरा यांनी व्यक्त केली.