किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलतेल अवीव, (२० ऑक्टोबर) – इस्रायलच्या भीषण हवाई हल्ल्यात गुरुवारी गाझामधील हमासच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय सुरक्षा दलाचा कमांडर जेहाद म्हेसेन ठार झाला. पॅलेस्टाईनच्या माध्यमांनी तसेच ‘जेरुसलेम पोस्टङ्कने ही बातमी दिली. गाझा शहरातील शेख रादवानच्या शेजारील त्याच्या घरावर झालेल्या हल्ल्यात म्हैसेन त्याच्या कुटुंबीयांसह ठार झाला. आयडीएफने अद्याप त्याच्या मृत्यूला दुजोरा दिलेला नाही. याव्यतिरिक्त, हमास रेडिओनुसार, इस्रायली माध्यमांनी गुरुवारी सांगितले की, आयडीएफ दलाने पॅलेस्टिनी विधान परिषदेच्या सदस्या आणि हमासच्या राजकीय ब्युरोमधील पहिली महिला सदस्य जमिला अब्दुल्ला ताहा अल-शांतीची हत्या केली.
६८ वर्षीय जमिला हमासच्या महिला चळवळीची संस्थापक होती आणि तिचा विवाह हमासचा संस्थापक आणि नेता अब्देल अझीझ अल-रंतिसी याच्याशी झाला होता. अब्देल अझीझला इस्रायली हवाई दलाने एप्रिल २००४ मध्ये हेलफायर क्षेपणास्त्राने ठार मारले होते. आयडीएफने हमासच्या राजकीय ब्युरोचा वरिष्ठ सदस्य आणि हमासच्या शूरा परिषदेचा प्रमुख ओसामा अल-मझिनी यालाही ठार केले. दहशतवादी संघटनेचा गाझाच्या दक्षिणेकडील जिल्ह्याचा राष्ट्रीय सुरक्षा कमांडर देखील लक्ष्यित हल्ल्यात मारला गेला.