किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– अमेरिकेने लादले प्रतिबंध,
वॉशिंग्टन, (२१ ऑक्टोबर) – पाकिस्तानच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी चिनी कंपन्यांद्वारे उपकरणांचा पुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या उपकरणांचा पाकिस्तानला पुरवठा केल्याबद्दल अमेरिकेने चीनच्या तीन कंपन्यांवर प्रतिबंध लादले असल्याची माहिती अमेरिकेच्या गृह विभागाने दिली. जागतिक अण्वस्त्र अपप्रसारचा एक भाग म्हणून हे प्रतिबंध लादण्यात आले असल्याची माहिती गृह विभागाने निवेदनात दिली. पीपल्स रिपब्लिकन ऑफ चायनामधील तीन कंपन्यांनी पाकिस्तानी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी उपकरणांचा पुरवठा केल्याने या कंपन्यांवर प्रतिबंध लादण्यात आल्याचे गृहविभागाने म्हटले आहे.
चीनने नेहमीच पाकिस्तानची मदत केली. पाकिस्तानच्या सैन्य आधुनिकीकरणाच्या कार्यक‘मात शस्त्रास्त्र आणि संरक्षण उपकरणांचा चीन हा मुख्य पुरवठादार राहिला आहे. पाकिस्तानला उपकरणे पुरवणार्या चिनी कंपन्यांमध्ये जनरल टेक्नॉलॉजी लि., बीजिंग लुओ लुओ टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कंपनी लि. आणि चांगझोऊ उटेक कंपोझिट कंपनी लि.चा समावेश आहे. अमेरिका मोठ्या प्रमाणात विनाश घडवणार्या शस्त्रांचा प्रसार, वितरणाची संसाधने आणि संबंधित खरेदीच्या विरोधातील कारवाई कायम ठेवेल, असे या कारवाईमुळे स्पष्ट झाले असल्याची प्रतिकि‘या अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी व्यक्त केली.
या वस्तू करून दिल्या उपलब्ध
जनरल टेक्नॉलॉजी लि.ने ब्रेजिंग सामुग्रीचा पुरवठा केला. याचा वापर बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या रॉकेट इंजिनमध्ये केला जातो. बीजिंग लुओ लुओ टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट कंपनीने मँड्रेल आणि इतर यंत्रे उपलब्ध करून दिली. या व्यतिरिक्त चांगझोऊ उटेक कंपोझिट लि.ने २०१९ मध्ये डी-ग्लास फायबर, कार्ट्झ कापड आणि उच्च सिलिका कापड उपलब्ध करून दिले. या सर्वच वस्तूंचा क्षेपणास्त्र यंत्रणेत वापर केला जातो.