किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलड्रॅगनची आगळीक सुरूच,
बीजिंग, ८ डिसेंबर –
लडाखमध्ये भारतासोबत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव सुरू असताना चीनने आता ईशान्य भारताच्या सीमेवर आगळीक केली आहे. चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगतच्या भागात तीन गावे वसवली आहेत. उपग्रह छायाचित्रांनुसार ही गावे बुमलापासून पाच किमी दूर आहे. इतकेच नव्हे, तर या गावात चीनने नागरिकांनाही स्थलांतरित केले आहे.
चीनने या भागावर आपला दावा आणखी प्रबळ करण्यासाठी ही गावे वसवली असल्याचे म्हटले जात आहे. चीनकडून सातत्याने अरुणाचल प्रदेशवर दावा केला जात आहे. अरुणाचल हा तिबेटचाच एक भाग असल्याची भूमिका चीनने मांडली आहे, तर अरुणाचल प्रदेश हा आमचाच भूभाग असल्याची ठाम भूमिका भारताने घेतली आहे. चीनने १९६२ च्या युद्धादरम्यान या ठिकाणच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवला होता.
प्लॅनेट लॅब्सच्या १७ फेब्रुवारी २०२०च्या छायाचित्रांच्या आधारे यावेळी फक्त एकच गाव वसवण्यात आले होते. या फोटोत २०च्या आसपास घरे असल्याचे दिसते, तर २८ नोव्हेंबरच्या दुसर्या फोटोत ५० हून अधिक घरांसह तीन नवीन एन्क्लेव्ह दिसत आहे. या भागात रस्त्यांचेही बांधकाम झाले असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.
चीन आपला दावा आणखी मजबूत करण्यासाठी आणि सीमा ओलांडून घुसखोरी करण्यासाठी सीमेलगतच्या भागात वस्ती वसवण्याच्या रणनीतीचा वापर करत असल्याचे चीनबाबतचे अभ्यासक डॉ. ब्रह्म चेलानी यांनी सांगतिले. चीनने भूतानच्या जमिनीवर गाव वसवले असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. चीनने वसवलेली गावे ही डोकलामपासून जवळ आहेत. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे जाणकार सांगतात.