किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलबीजिंग, ८ डिसेंबर – हिमालय हे एक गूढच आहे. त्याची सर्वच शिखरे पादाक्रांत करणे हा जगातील गिर्यारोहकांसाठी धाडसाची परमावधीच असते. त्यातही माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर… आता त्याची उंची आतावर समजली जात होती, त्यापेक्षाही अधिक आहे, असे नेपाळ आणि चीनने मंगळवारी जाहीर केले. या दोन्ही देशांनी संयुक्त सर्वेक्षण केल्यावर एव्हरेस्टची उंची ८,८४८.८६ मीटर असल्याचे जाहीर केले आहे.
भारताने या आधी १९५४ साली या शिखराची उंची मोजली होती. त्यानंतर एवरेस्टच्या उंचीबद्दल कायम वाद-चर्चा होत राहिली आहे. आता या दोन देशांनी संयुक्त उपक्रमात मोजलेली उंची भारताने मोजलेल्या उंचीपेक्षा ८६ सेंटीमीटर जास्त असल्याचे चीन आणि नेपाळचे म्हणणे आहे.
२०१५ साली झालेला विनाशकारी भूकंप आणि भूगर्भातील घडामोडींमुळे मधल्या काळात एव्हरेस्टची उंची वाढली असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे नेपाळ सरकारने एव्हरेस्टची नेमकी उंची मोजण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी ही मोहीम हाती घेतली. चीन आणि नेपाळने मंगळवारी संयुक्तपणे आताची उंची जाहीर केली. अशी माहिती चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिली आहे.
नेपाळने माऊंट एव्हरेस्टची मोजलेली उंची ८८४८.८६ मीटर मोजली, असे नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ज्ञवाली यांनी काठमांडू येथे जाहीर केले. या आधी १९५४ साली ‘सर्व्हे ऑफ इंडिया’ने केलेल्या मोजमापानुसार माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर होती. चीननेही या आधी एव्हरेस्टची उंची मोजली होती. ती ८८४४.४३ मीटर भरली होती. नेपाळच्या मोजमापापेक्षा ही उंची चार मीटरने कमी होती.
आजवरच्या माहितीनुसार, चिनी सर्वेक्षणकर्त्यांनी माऊंट एव्हरेस्टची उंची मोजणे आणि वैज्ञानिक अभ्यास करण्यासाठी सहा फेर्या केल्या आहेत. १९७५ आणि २००५ साली चीनने असे प्रयत्न केले. त्यानुसार अनुक्रमे एव्हरेस्टची उंची ८८४८.१३ आणि ८८४४.४३ मीटर मोजण्यात आली होती.
चीन आणि नेपाळने आपल्या सीमा १९६१ साली निश्चित केल्या होत्या. त्या एव्हरेस्टच्या शिखरावरून जातात. माऊंट एव्हरेस्टजवळ भारतीय आणि युरेशियन प्लेटच्या कडा लागून आहेत आणि त्या ठिकाणी नेहमीच भूगर्भिय हालचाली होत असतात. चीनच्या अकादमी ऑफ सायन्सेसच्या वायुमंडलीय भौतिकशास्त्रज्ञ गाओ डेंगई यांनी यापूर्वीच्या चिनी राज्य माध्यमांना सांगितले की, एव्हरेस्टची उंची अचूकपणे मोजणे हिमालय आणि किंघाई-तिबेट पठाराच्या बदलांच्या अभ्यासास उपयुक्त आहे.