किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल११ पक्षीय विरोधी आघाडीची घोषणा,
इस्लामाबाद, ९ डिसेंबर – या महिन्याच्या अखेरपर्यंत आमचे सर्व खासदार संसदेतून सामूहिक राजीनामा देतील, अशी घोषणा ११ पक्षीय विरोधी आघाडीने केल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय संकट अधिकच तीव्र झाले आहे. देशात मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर दबाव आणण्याची विरोधी आघाडीची ही योजना आहे.
११ राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या पाकिस्तान डेमॉकॅ्रटिक मूव्हमेंटच्या मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत सामूहिक राजीनामे देण्याचा निर्णय घेण्यात आला. इम्रान सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सप्टेंबर महिन्यात ही आघाडी स्थापन करण्यात आली होती.
या आघाडीचे प्रमुख मौलाना फझलूर रेहमान यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, आघाडीतील सर्व खासदार याच महिन्याच्या अखेरीस सामूहिक राजीनामे देणार आहेत. इम्रान सरकारमुळे पाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीत आला असून, देशाला वाचविण्यासाठी या सरकारने तत्काळ राजीनामा द्यायला हवा.
इम्रान खान यांच्या पक्षाला सत्तेत आणण्यासाठी आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराने २०१८ मधील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल आपल्या मर्जीनुसार हाताळले आहेत. निवडणूक अधिकार्यांवर दबाव आणून त्यांना हे निकाल इम्रान यांच्या बाजूने लावण्यास भाग पाडण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला. आम्हाला देशात मध्यावधी निवडणुका हव्या आहेत आणि या निवडणुकीत लष्कर किंवा आयएसआयचा हस्तक्षेप कदापि मान्य केला जाणार नाही. इम्रान सरकारने राजीनामा देऊन, निवडणुकीचा मार्ग आता मोकळा करायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.