किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमध्यआफ्रिकी देश कांगोमधील घटना,
किन्शासा, २३ मे – मध्यआफ्रिकी देश असलेल्या कांगोमधील गोमा शहराजवळ काल शनिवारी रात्री झालेल्या ज्वालामुखी उद्रेकानंतर संयुक्त राष्ट्राच्या (यूएन) शांतता मोहिमेचा एक भाग म्हणून येथे तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीने स्थानिक नागरिकांचे प्राण वाचविले असून, संयुक्त राष्ट्रसंघाच्या मालमत्तेचेही संरक्षण केले, अशी माहिती सूत्रांनी आज रविवारी दिली.
काल शनिवारी रात्री सुमारे दोन दशकात प्रथमच माउंट न्यरागोंगो ज्वालामुखी फुटल्यानंतर हजारो लोकांनी गोमामधील आपली घरे सोडली आहेत. ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर भारतीय लष्कराने आपला जीव धोक्यात घालत नागरिक आणि यूएनच्या इतर कर्मचार्यांना त्वरेने बाहेर काढण्यात मदत केली. भारतीय लष्करामुळेच नागरिकांचे संरक्षण शक्य झाले, अशी माहिती स्थानिक अधिकार्यांनी दिली.
खबरदारीचा उपाय म्हणून, यूएनच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेने विविध देशांच्या लष्करी तुकड्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. विमानचालन दलांसह बहुसंख्य कर्मचार्यांना भारतीय लष्कराने सुरक्षित जागेवर आणले आहे.
भारतीय लष्कराने शांततेने आणि यशस्वीपणे परिस्थितीचा सामना केला. त्यांनी छावण्यांमधील ७० टक्के संख्या कमी केली असून, काही जवानांना सुरक्षेसाठी हिम्बी कंपनी ऑपरेटिंग बेस (सीओबी) येथे पाठविले आहे, अशी माहिती यूएनच्या अधिकार्यांनी दिली.