किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-याचिका दाखल करण्याच्या कालावधीत वाढ,
वॉशिंग्टन, (०६ ऑक्टोबर) – अमेरिकेतील एका न्यायालयाने २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानी नागरिक तसेच कॅनडातील व्यावसायिक तहव्वूर राणा याला भारतात प्रत्यार्पण करण्याच्या विरोधात याचिका दाखल करण्याचा कालावधी आणखी वाढवून दिला आहे. कॅलिफोर्नियातील सेंट्रल डिस्ट्रिक्टमधील युनायटेड स्टेट्स डिस्ट्रिक्ट न्यायाधीश डेल एस. फिशर यांनी २ ऑगस्ट रोजी तहव्वूर राणाची बंदी प्रत्यक्षीकरण रिट याचिका खारीज केली होती.
मात्र, त्याने या आदेशाविरोधात नवव्या सर्किट कोर्टात अपील दाखल करत सुनावणीपर्यंत भारताकडे न सोपविण्याची विनंती केली होती. याच संदर्भात न्यायाधीश डेल एस. फिशर यांनी १८ ऑगस्ट रोजी नवा आदेश जारी करत राणाचे प्रत्यार्पण रोखण्याची मागणी करणार्या एकतफी अर्जाला मंजुरी दिली. याशिवाय या संदर्भात सर्व याचिका खारीज केल्या.
प्रकरण असे…
२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई शहरात झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणात सूत्रधार राणा याला अमेरिकेत अटक केली होती. भारताची राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) २००८ मध्ये पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ला प्रकरणात राणाच्या सहभागाचा तपास सुरू आहे. भारताने १० जून २०२० रोजी प्रत्यार्पणाच्या दृष्टीने राणाला हंगामी अटक करण्याची मागणी केली होती. तर, बायडेन प्रशासनाने राणाच्या प्रत्यार्पणाचे समर्थन केले होते.