किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-डेरा गाझीमध्ये युरेनियमचा साठा,
इस्लामाबाद, (०६ ऑक्टोबर) – पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या दक्षिणेकडील डेरा गाझी खान जिल्ह्यात भीषण स्फोट झाला. हा स्फोट अणुबॉम्ब तळाजवळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. २०१२ मध्ये तहरिक-ए-तालिबानच्या अतिरेक्यांनी हा तळ उडवून देण्याची धमकी होती. तेव्हापासून हा अणुतळ अत्यंत सुरक्षेत आहे. पाकिस्तानने डेरा गाझीमध्येच युरेनियमचा साठा ठेवला आहे. डेरा गाझी खानमध्ये बनवलेले अणू केंद्र पाकिस्तानातील सर्वांत मोठे आहे.
या अणुतळाला असलेला धोका लक्षात घेऊन पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. पाकिस्तान या ठिकाणी युरेनियम ग्राईंडिंग आणि खाणकाम करतो. येथे युरेनियमचा कारखानाही उभारला आहे. त्यामुळेच या संपूर्ण भागात पाकिस्तानी लष्कराने कडक बंदोबस्त ठेवला आहे. हा स्फोट अणुतळाच्या आत झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे, तर पाकिस्तानी माध्यमाने याचा इन्कार केला आहे. हा स्फोट लपवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असू शकतो, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानवर लक्ष ठेवणार्या एफजे या विश्लेषकाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला. अनेकांनी ट्विट करून अणुतळाजवळ स्फोटाची पुष्टी केली. पाकिस्तानमधील डेरा गाझी खान परिसर हा टीटीपी दहशतवाद्यांचा गड मानला जातो. आजकाल पाकिस्तान अतिशय वेगाने अणुबॉम्ब बनवत आहे आणि त्याने भारतालाही मागे टाकले आहे. पाकिस्तानकडे सध्या १७० अणुबॉम्ब असून, येत्या काही वर्षांत हा आकडा २०० च्या पुढे जाऊ शकतो. यामुळेच डेरा गाझी खान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.