किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलवॉशिंग्टन, २६ नोव्हेंबर – अमेरिका भक्कमपणे भारताच्या पाठीशी असून, दहशतवादविरोधी लढ्यात भारताला साथ देण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने दिली. मुंबई हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी या हल्ल्याच्या कटकर्त्यांना न्यायालयासमोर खेचण्यासही अमेरिका कटिबद्ध असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबई हल्ल्याला आज गुरुवारी १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. अतिरेक्यांना न्यायालयासमोर उभ्या करण्याच्या कार्यक्रमांतर्गत मुंबई हल्ल्याच्या कटकर्त्यांना देखील न्यायालयासमोर खेचले जाईल, असे अमेरिकी गृह विभागाचे उपप्रवक्ते केल ब्राऊन यांनी सांगितले. मुंबई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सहा अमेरिकींसह सर्वच पीडितांना न्याय दिला जाईल. आम्ही भारताच्या सोबत आहोत आणि दहशतवादाविरोधातील लढाई सोबत लढू, असे त्यांनी सांगितले.
‘त्या’ देशांवर बहिष्कार टाका ः इस्रायल
दहशतवाद आणि दहशतवादासाठी निधी देणार्या प्रत्येक देशाला इस्रायलचा विरोध आहे. यासाठी शांततेचा पुरस्कार करणार्या देशांनी एकत्र येऊन, दहशतवादाचे समर्थन करणार्या देशांवर राजनयिक आणि आर्थिक बहिष्कार घालावा.
यामुळे दहशतवाद रोखण्यास मदत मिळेल, अशी भूमिका मुंबई हल्ल्यात बळी ठरलेल्या इस्रायली नागरिकांच्या नातेवाईकांनी घेतली आहे.