किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलइस्लामाबाद, २६ नोव्हेंबर – अफगाणिस्तानातील अल्-कायदाचा बिमोड करण्यासाठी अमेरिकी मदत लाटून या देशालाच धोका देणार्या पाकिस्तानने आता नवीन शक्कल लढवली आहे. एफएटीएफच्या काळ्या यादीत समावेश होऊ नये, यासाठी काही पाऊले उचलत असल्याचे पाकिस्तान दर्शवत आहे. याचाच भाग म्हणून या देशाने लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईद याला शिक्षा ठोठावली. मात्र, सईद घरातच कारावास भोगत असून, तो मुक्तपणे दहशतवादी संघटनांचे कामकाज करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हाफिझला जुलै २०१९ मध्ये अधिकृत रीत्या अटक करण्यात आली. दहशतवाद निधी प्रकरणात त्याला १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. मागील आठवड्यात दोन दहशतवाद निधी प्रकरणांत त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
एफएटीएफच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एफएटीएफने काळ्या यादीत टाकल्यास पाकिस्तानी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, याची जाणीव इम्रान खान सरकारला असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली.
भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, हाफिझ उच्च सुरक्षा असलेल्या लाहोर येथील कोट लखपत येथील तुरुंगात असल्याचा गवगवा पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र, तो घरीच असून अनेक जण त्याच्या भेटीगाठी घेत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेच्या एका अधिकार्याने दिली. तिथेच इम्रान खान यांनी त्याच्या घरालाच आम्ही तुरुंग बनविले असल्याची बडबड केली.
आंतरराष्ट्रीय समुदायाची फसवणूक करीत यापूर्वी केलेल्या अतिरेक्यांच्या बचावाप्रमाणेच यावेळी देखील पाकिस्तानने असेच कृत्य केले आहे, असे गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानी प्रशासनाने हाफिझ सईदच्या न्यायालयीन कोठडीबाबत औपचारिकता पूर्ण केली अथवा नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही अधिकार्यांनी सांगितले.
झकी-उर-रेहमान लखवीने घेतली भेट
लष्कर-ए-तोयबाच्या जिहाद विभागाचा प्रमुख झकी-उर-रेहमान लखवीने मागील महिन्यात त्याची भेट घेतल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेला प्राप्त झाली आहे. जिहादसाठी निधी उभारण्याबाबत त्यांच्यात यावेळी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.