किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलजेरूसलेम, २३ डिसेंबर – भ्रष्टाचारात अडकलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांचे सरकार मंगळवारी कोसळले. अर्थसंकल्प पारित करून घेण्याची नियोजित वेळ निघून गेल्याने नेतान्याहू सरकारला राजीनामा द्यावा लागला. देशात आता पुन्हा निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
मागील दोन वर्षांत देशात चौथ्यांदा सार्वत्रिक निवडणुका घेण्याची नामुष्की ओढवली असून, २३ मार्च रोजी देशात पुन्हा निवडणुका घेतल्या जाणार आहेत, असे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.
नेतान्याहू यांच्या पक्षासोबत आघाडी करून सत्ता स्थापन करणारे ब्लू ऍण्ड व्हाईट पक्षाचे नेते बेनी गेंट्ज यांनी अर्थसंकल्प पारित न होऊ शकल्याने एकमेकांना दोष देण्यास सुरुवात केली आहे. सात महिन्यांपूर्वीच नेत्यान्याहू यांनी गेंट्ज यांच्या पाठिंब्याच्या जोरावर देशात सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वारंवार संघर्ष उफाळून आला. ब्लू ऍण्ड व्हाईटने धोरणांप्रमाणे न वागता कोरोनाच्या संकटात देशाला निवडणुकीच्या उंबरठ्यावर उभे केले, अशी टीका नेतान्याहू यांनी केली. आम्हाला देशात पुन्हा निवडणूक व्हावी, असे वाटत नव्हते. आम्ही निवडणुकीला घाबरत नाही; कारण आम्ही ती जिंकणारच आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे गेंट्ज यांनी नेतान्याहू यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचा संदर्भ देत टीका केली. पंतप्रधान नेतान्याहू जनहितापेक्षा त्यांच्यावरील खटल्यांबद्दल जास्त चिंतेत आहेत, याचे मला वाईट वाटते. देशातील आर्थिक घडी नीट बसविण्याऐवजी आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याऐवजी ते देशाला अनिश्चिततेकडे घेऊन जात
आहेत, असा आरोप गेंट्ज यांनी केला आहे.
याच वर्षी एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीनंतर गेंट्ज यांनी नेतान्याहू सरकारला आपत्कालीन स्थितीत पाठिंबा जाहीर केला होता. मे महिन्यात दोन्ही पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्यावर सहमती दर्शविली. यावेळी दोन्ही पक्षांमध्ये एक ठराव झाला. त्यानुसार पहिल्या १८ महिन्यांसाठी नेतान्याहू व पुढील १८ महिने गेंट्स पंतप्रधान असतील, असे ठरले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद उफाळून आले. नेतान्याहू यांनी शब्द पाळला नाही, असा आरोप गेंट्ज यांनी केला.