किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादललंडन, २३ डिसेंबर – ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याने विविध देशांनी ब्रिटनमधून येणार्या विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. फ्रान्सने देशात येणार्या ट्रक्सवर बंदी घातल्याने हजारो मालवाहू वाहने आणि अनेक प्रवासी विमानतळांवर अडकले असल्याचे दिसून आले आहे.
सौदी अरेबिया, कुवैत, ओमान, भारत, इराण, कॅनडा यासारख्या देशांनी ब्रिटनमधून येणार्या सर्व प्रवाशांवर, तर अमेरिकाने बहुतांश बिगरअमेरिकी प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. भरीसभर युरोपीय महासंघातील सर्व सदस्य देशांनी ब्रिटनमधून येणार्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. फ्रान्सने ही स्थिती सामान्य होईपर्यंत मालवाहू वाहनांवर बंदी घातली आहे. परिणामी ब्रिटनमध्ये अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली. यानंतर दोन्ही देशातील दळणवळण लवकरच सुरळीत होईल, अशी आशा जॉन्सन यांनी व्यक्त केली. व्यापारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन्ही देशांतील अधिकारी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्समध्ये प्रवेश करणार्या व्यक्तींची विषाणूबाबतची चाचणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे मॅक्रॉन यांनी स्पष्ट केले. दरम्यान, युरोपीय महासंघातील २७ देश ब्रिटनबाबतच्या नव्या उपाययोजना शिथिल करण्याचा विचार करीत आहेत.
वाहनांच्या रांगा
दुसरीकडे फ्रान्सने सीमा बंद केल्याने हजारो ट्रकचालकांना इंग्लिश खाडीचे बंदर असलेल्या डोवर येथे, तर काहींना मॅनस्टन विमानतळावर पाठविण्यात आले. बंदरातून दररोज १० हजार ट्रक्स ये-जा करतात. ब्रिटनच्या एकू ण मालवाहतुकीपैकी या वाहतुकीचे प्रमाण २० टक्के आहे.