किमान तापमान : 23.14° से.
कमाल तापमान : 23.43° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.26 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.14° से.
22.99°से. - 26.45°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
शनिवार, 25 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
रविवार, 26 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलवॉशिंग्टन, २३ डिसेंबर – अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सध्या कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी ६० लाखांपेक्षा जास्त झाली आहे. तसेच मृतांची संख्याही तीन लाखांहून जास्त झाली आहे.
२० डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गत आठवड्यात अमेरिकेत कोरोनामुळे दर ३३ सेकंदाला एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सात दिवसांत अमेरिकेत १८ हजार लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले.
गत आठवड्यातील मृतांची संख्या ही आधीच्या आठवड्याच्या तुलनेत ६.७ टक्के अधिक आहे. गत आठवड्यात अमेरिकेत कोरोनाच्या नवीन प्रकरणात एक टक्क्याने घट झाली आहे. कॅलिफोर्निया, रोड आयर्लंड व टेनेसी या भागात सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले. तर, आयोवा, साऊथ डकोटा व रोड आयर्लंड या भागात सर्वाधिक मृतांची नोंद करण्यात आली.
अमेरिकेतील ५० पैकी ३१ राज्यांमध्ये संसर्गाचा दर हा १० टक्क्यांहून अधिक आहे. आयोवा व आयडेहोसारख्या भागात हा दर ४० टक्क्यांहून अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ५ टक्क्यांहून अधिक संसर्ग दर असल्यास चिंतेची बाब आहे.
अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून लोकांनाही आवाहन केले जात आहे. आरोग्य अधिकार्यांनी लोकांना सुट्टीच्या दिवशी प्रवास न करण्याचे आवाहन केले होते. मात्र, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी अमेरिकेच्या विमानतळांवर गर्दी दिसून आली. या तीन दिवसांत ३२ लाख प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली. लोकांनी सुट्टी साजरी करण्यासाठी प्रवास टाळला पाहिजे, असे मत अधिकार्यांनी व्यक्त केले. मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे.
अमेरिकेत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, वेगाने बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.