किमान तापमान : 22.48° से.
कमाल तापमान : 23.45° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 52 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.48° से.
21.99°से. - 26.45°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.98°से. - 27.28°से.
रविवार, 26 जानेवारी कुछ बादल25.48°से. - 28.18°से.
सोमवार, 27 जानेवारी छितरे हुए बादल25.59°से. - 27.73°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.32°से. - 27.45°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल24.72°से. - 26.64°से.
गुरुवार, 30 जानेवारी टूटे हुए बादलवॉशिंग्टन, २२ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या ‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यावतीने हा पुरस्कार भारतीय राजदूत तरणजितसिंग संधू यांनी स्वीकारला.
मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: या पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदी यांचे नाव सुचविले आहे. मोदी यांना याआधी रशिया, सौदी अरब, बहरिन, संयुक्त अरब अमिरात आणि मालदीव आदी देशांनी, तेथील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.
‘लीजन ऑफ मेरिट’ पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. जगाच्या कल्याणासाठी अतुलनीय आणि असामान्य कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी मजबूत झाले. यामुळेच ट्रम्प यांनी मोदींना हा पुरस्कार जाहीर केला.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी हा सन्मान भारतीय राजदूत तरणजितसिंग संधू यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांनी पुरस्काराचे छायाचित्र टि्वट करीत, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. जागतिक पातळीवर भारताला प्रतिष्ठा प्राप्त करून देतानाच, भारत-अमेरिका संबंध अधिक मजबूत केले आणि यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे ओब्रायन यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही पुरस्कार
डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले आहे. या दोन्ही देशांसोबत अमेरिकेचे चांगले संबंध आहेत.