किमान तापमान : 28.76° से.
कमाल तापमान : 29.58° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 5.62 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.58° से.
27.43°से. - 30.53°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.65°से. - 29.75°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– ७२ तासांत भूकंपाचे ४५० सौम्य धक्के,
काठमांडू, (०७ नोव्हेंबर) – नेपाळमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपानंतर आफ्टरशॉक सुरूच आहेत. गेल्या ७२ तासांत ४५० हून अधिक आफ्टरशॉक बसले आहेत. यापैकी ४ रेक्टर स्केलचे धक्के १० वेळा झाले आहेत. सोमवारी सायंकाळी बसलेला धक्काही असाच होता. वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११.४७ वाजता जाजरकोटमधील रामीदांडको येथे झालेल्या ६.४ तीव्रतेच्या भूकंपानंतर सोमवारी मध्यरात्रीपर्यंत ४५६ भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापैकी ४ रेक्टर स्केलपेक्षा मोठे १० धक्के आहेत.
सोमवारी संध्याकाळी ५.८ आणि ४.५ रिश्टर स्केलचा धक्काही त्याचाच एक भाग आहे. दुसरीकडे, सोमवारी संध्याकाळी झालेल्या भूकंपात १३ जण जखमी झाले असून सुमारे डझनभर घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. जाजरकोटचे मुख्य जिल्हा दंडाधिकारी सुरेश सुनार यांनी सांगितले की, सततच्या भूकंपामुळे ज्या घरांना फक्त भेगा पडल्या आहेत, त्या घरांना पडण्याचा धोका आहे. या भागातील लोक अजूनही घरात राहण्यास घाबरत आहेत.