किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमनिला, (०५ नोव्हेंबर) – जगभरात आर्थिक प्रभाव निर्माण करण्यासाठी चीनने अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीतून उभारत असलेल्या ‘बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्प अडचणीत आला आहे. चीनच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून कित्येक देश बाहेर पडत आहेत. काही दिवसांपूर्वी इटलीने बीआरआय प्रकल्पातून माघार घेतली. आता फिलिपाईन्सने या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याची घोषणा करीत चीनला मोठा झटका दिला.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अलिकडेच बीजिंग येथे बीआरआय फोरमचे आयोजन केले होते. यात २३ देशांचे प्रमुख सहभागी झाले होते. मात्र, या कार्यक‘मानंतर काही दिवसांतच इटली आणि फिलिपाईन्सने बीआरआय प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. बीआरआय प्रकल्पातून बाहेर पडण्याची घोषणा फिलिपाईन्सच्या परिवहन मंत्रालयाने केली. फिलिपाईन्स आणि चीनमध्ये सध्या दक्षिण चिनी समुद्राच्या मुद्यावरही वाद सुरू आहे. त्यामुळेच बीआरआय प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय फिलिपाईन्सने घेतल्याचे सांगितले जात आहे.
अलिकडच्या काही वर्षांत बीआरआय प्रकल्पाचा वेग मंदावला आहे. चीनची आर्थिक ताकद घटली असून, चीनच्या कर्जसापळ्यामुळे कित्येक देश सावधगिरी बाळगत आहेत. दक्षिण चिनी समुद्रात फिलिपाईन्सच्या गस्तीच्या विरोधात चीनने कठोर भूमिका घेतली होती. त्याबाबत फिलिपाईन्सचे राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी चिंता व्यक्त केली होती. बीआरआयच्या अंतर्गत फिलिपाईन्समध्ये ४.९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा चीनने केली होती. मात्र, आता जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि युरोपियन युनियनच्या गुंतवणुकीला मंजुरी देण्याचा विचार फिलिपाईन्स करीत आहे.