किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमिन्स्क, (४ मार्च) – प्रख्यात मानवाधिकार कार्यकर्ते आणि २०२२ चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते एलेस बिलियात्स्की यांना बेलारूसमधील स्थानिक न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. बिलियात्स्कीला सार्वजनिक सुव्यवस्था, वित्तपुरवठा आणि तस्करी बिघडवणार्या क्रियाकलापांसाठी शिक्षा सुनावण्यात आली. राजधानी मिन्स्कच्या लेनिन्स्की जिल्हा न्यायालयाने ६० वर्षीय बिलियात्स्कीला णड६५,००० चा दंडही ठोठावला.
बिलियात्स्की हे वेस्ना मानवाधिकार केंद्राचे प्रमुख आहेत. बिलियात्स्की सोबत, वेस्ना मानवाधिकार केंद्राचे प्रतिनिधी, व्हॅलेंटीन स्टेफानोविच आणि व्लादिमीर लॅबकोविच यांनाही ९-७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेदरम्यान तिघांनाही अतिसुरक्षित पॅनेल कॉलनीत ठेवण्यात येणार आहे. तसेच दिमित्री सोलोव्यॉव्हला आठ वर्षांची शिक्षा सुनावली असली तरी ते सध्या बेलारूसच्या बाहेर आहे. वेस्ना केंद्राच्या प्रतिनिधींना जुलै २०२१ मध्ये ताब्यात घेण्यात आले. एप्रिल २०१६ ते जुलै २०२१ या कालावधीत एलेस बिलियात्स्की आणि इतर सदस्यांना लिथुआनियामधील विविध संस्थांकडून निधी मिळाल्याचे तपासात उघड झाले आहे. यानंतर अनेक लोकांच्या मदतीने हे निधी युरेशियन इकॉनॉमिक युनियनच्या बाहेर पाठवण्यात आले. बेलारूसच्या कायद्यानुसार, हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याची कमाल शिक्षा १२ वर्षे आहे.
’नोबेल शांतता पारितोषिक विजेते एलेस बिलियात्स्की यांच्यासह मानवाधिकार कार्यकर्त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे भयानक असल्याचे तेथील विरोधी पक्षनेते म्हणत आहे. आयल्सने अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. ते बेलारूसचा खरा हिरो आहे आणि हुकूमशहा नंतरही त्याचे नाव आदराने घेतले जाईल. यूएन मानवाधिकार प्रमुख वोल्कर टार्क यांनी देखील एलेस बियायात्स्कसह मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेबद्दल नाराजी व्यक्त केली. अॅलेस बिलियात्स्की यांना लोकशाही समर्थक मानले जाते आणि म्हणूनच ते बेलारूसच्या हुकूमशहा अलेक्झांडर लुकाशेन्को सरकारच्या निशाण्यावर आहेत. बियायात्स्की यांनी १९८० पासून बेलारूसमध्ये मानवी हक्क उल्लंघनाचे दस्तऐवजीकरण केले आहे. २०२० मध्ये, जेव्हा बेलारूसमध्ये लुकाशेन्को सरकारच्या विरोधात देशव्यापी निदर्शने सुरू होती, त्यावेळी बियाल्यात्स्कीलाही अटक करण्यात आली होती.