किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकॅनबेरा, (४ मार्च) – ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये एका मंदिरावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरातील लक्ष्मी नारायण मंदिरात शनिवारी तोडफोडीची घटना घडली. लक्ष्मी नारायण मंदिराच्या तोडफोडीच्या या घटनेत खलिस्तान समर्थकांचा हात असल्याचे बोलले जात आहे. ऑस्ट्रेलियातील मंदिरात दोन महिन्यांत तोडफोड होण्याची ही चौथी घटना आहे. या घटनेची माहिती सकाळी भाविक पूजेसाठी मंदिरात पोहोचले असता त्यांना समजले. ऑस्ट्रेलिया टुडेच्या वृत्तानुसार, खलिस्तानी समर्थकांनी ब्रिस्बेनच्या दक्षिणेकडील बरबँक येथील श्रीलक्ष्मी नारायण मंदिराची कथितपणे तोडफोड केली.
याआधीही ब्रिस्बेनमधील गायत्री मंदिरातील आणखी एका हिंदू मंदिराला खलिस्तानी अतिरेक्यांकडून धमकीचे फोन आले होते. हे कॉल्स पाकिस्तानच्या लाहोर शहरातून करण्यात आले होते. पाकिस्तानातील लाहोरमधून आलेले फोन कॉल्स खलिस्तान समर्थकांनी केले होते.मंदिराचे अध्यक्ष सतींदर शुक्ला यांनी ऑस्ट्रेलिया टुडेला सांगितले की, आज सकाळी मंदिरातील पुजारी आणि भक्तांनी फोन करून मला मंदिराच्या सीमाभिंतीच्या तोडफोडीची माहिती दिली. शुक्ला पुढे म्हणाले की, पोलीस अधिकार्यांसोबत व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन याबाबत सविस्तर निवेदन देऊ. हिंदू मानवाधिकारांनी खलिस्तानच्या या कृत्याचे वर्णन हिंदूंना दहशतीचा एक नमुना असे केले आहे. हिंदू ह्युमन राइट्सच्या महासंचालक सारा एल गेट्स यांनी ऑस्ट्रेलिया टुडेला सांगितले की, हिंदू मंदिरांवरील हल्ले हे शिख फॉर जस्टिस (एसएफजे) या अतिरेकी संघटनेचा नमुना आहे. ऑस्ट्रेलियन हिंदूंना घाबरवणे हा त्याचा उद्देश आहे.