किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलजोहान्सबर्ग, (२३ ऑगस्ट) – दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षतेत सुरू झालेल्या १५ व्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी जोहान्सबर्ग येथे दाखल झाले आहेत. प्रिटोरियाच्या बाहेरील वॉटरक्लूफ एअर फोर्स बेसवर पंतप्रधान मोदींचे आगमन झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती पॉल माशाटाईल यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
२०१९ नंतरची ही पहिली ब्रिक्स शिखर परिषद आहे आणि परिषदेद्वारे हाती घेतलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्याची तसेच भविष्यातील कारवाईची क्षेत्रे ओळखण्याची संधी प्रदान करेल. आपल्या भेटीदरम्यान पंतप्रधान जोहान्सबर्गमध्ये उपस्थित असलेल्या काही नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतील आणि ‘ब्रिक्स-आफ्रिका आऊटरीच’ व ‘ब्रिक्स प्लस डायलॉग’ ब्रिक्स शिखर परिषदेनंतर आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. यात इतर देशांना आमंत्रित केले जाईल, असे दक्षिण आफ्रिकेने म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या स्थानिक भारतीय सदस्यांशी संवाद साधला. सँडटन येथे जिथे शिखर परिषद आयोजित केली आहे, तिथे भारतीयांचा मोठा समुदाय पंतप्रधानांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. दक्षिण आफ्रिकेला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्या निमंत्रणावरून २५ ऑगस्ट रोजी ग्रीसला अधिकृत भेट देतील. भारतीय पंतप्रधान ४० वर्षांत पहिल्यांदाच ग्रीसला भेट देणार आहेत. भारत आणि ग्रीसमध्ये नागरी संबंध आहेत, जे अलिकडच्या कार्यकाळात सागरी वाहतूक, संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रांमध्ये मजबूत झाले आहेत.