किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलपेशावर, १ जानेवारी – पाकिस्तानात खैबर पख्तुनख्वा प्रांतात बुधवारी मंदिराच्या विस्तार कार्याला विरोध करण्यासाठी आलेल्या जमावाने मंदिराच्या जुन्या ढाच्यासह नवे बांधकामदेखील जमीनदोस्त करण्यात आले. जिल्हा पोलिस प्रमुख इरफान मरवत यांनी याबाबत माहिती दिली.
माहितीनुसार, संबंधित मंदिर करक जिल्ह्यात असून, देशभरातील हिंदू कुटुंब दर गुरुवारी याठिकाणी भेट देत असे. याच परिसरात एका धार्मिक हिंदू नेत्याची समाधी आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नसून मंदिरावरील हल्ला आणि तोडफोड दुर्दैवी असल्याचे खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांकडून अहवाल मागितला असून, दोषींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे या घटनेमुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्याचे हिंदू समुदायाचे नेते हारून सरबयाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड ही सातत्याने होत असल्याचे दिसून येते. मागील नोव्हेंबर महिन्यात सिंध प्रांतात कट्टरवाद्यांनी जुन्या कराचीतील शीतलदास कम्पाऊंड परिसरात असलेल्या प्राचीन मंदिराची तोडफोड केली होती. या मंदिराजवळ जवळपास ३०० हिंदू कुटुंब वास्तव्यास आहेत, तर पाकिस्तानच्या लोकसंख्येचा विचार केला गेल्यास हिंदू सर्वात मोठा अल्पसंख्यक समुदाय आहे. अधिकृत आकडेवारीनुसार या देशातील हिंदूंची संख्या ७५ लाख इतकी आहे.