किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलमुकेश अंबानींंना मागे टाकले,
मुंबई, ३१ डिसेंबर – रिलायन्स उद्योगाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आतापर्यंत आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांचे हे स्थान आता चीनच्या एका उद्योगपतीने घेतले आहे. पत्रकारिता, मशरूम शेती आणि आरोग्य सेवा यासारख्या क्षेत्रांत कारकीर्द घडविल्यानंतर बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात उतरलेले चीनमधील झोंग शानशन आता आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
झोंग शानशन हे चीनमधील बाटलीबंद पाण्याचा ब्रॅण्ड असलेल्या नांग्फू स्प्रिंग या कंपनीचे संस्थापक आहेत. त्यांनी मुकेश अंबानी आणि चीनच्या अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांना मागे टाकले. शानशन यांच्या संपत्तीत यावर्षी वाढ होऊन, ती ७७८० कोटी डॉलर्स (५.७ लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे.
ब्लूमबर्ग बिलेनियर इन्डेक्सच्या अहवालानुसार, शानशन हे आता जगातील ११ वे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ लक्षणीय आहे. चीनच्या बाहेर त्यांना जास्त कोणी ओळखत नाही. कोणतीही राजकीय किंवा औद्यौगिक पृष्ठभूमी नसलेले शानशन हे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
झोंग शानशन यांच्या नांग्फू स्प्रिंग या बाटलीबंद पाण्याच्या उद्योगाची हॉंगकॉंग शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर, मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांच्या बीजिंग वान्टाई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्रायजेस कॉर्पोरेशनलाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
आतापर्यंत मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानी होते. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स शेअर्सच्या किमतीत घसरण झाली आणि त्याच वेळी नांग्फू स्प्रिंगच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा प्रवाह वाढत राहिला. शानशन यांच्या मालकीची बीजिंग वान्टाई बायोलॉजिकल फार्मसी कॉर्पोरेशन ही कंपनी चीनमध्ये कोरोना लसीच्या निर्मितीत भागीदार आहे.
मावळते वर्ष रिलायन्ससाठी फायद्याचे
दरम्यान, मुकेश अंबानी यांचे जागतिक श्रीमंतांच्या यादीतील स्थान घसरले असले, तरी त्यांच्या रिलायन्स उद्योगासाठी मावळते वर्ष फायद्याचे ठरले.
रिलायन्सने या वर्षात अनेक नवे व्यवहार केले आणि ई-कॉमर्स क्षेत्रातही प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्या या वर्षीच्या १,८३० कोटी डॉलर्स (१.३ लाख कोटी रुपये) या एकूण संपत्तीत वाढ होऊन ती ७,६९० कोटी डॉलर्स (५.६ कोटी रुपये) इतकी झाली आहे.