किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलपाकिस्तानची डोकेदुखी वाढणार,
इस्लामाबाद, ३० डिसेंबर – पाकिस्तानी लष्कर आणि सरकारच्या दडपशाहीविरोधात लढणार्या बलुच बंडखोरांनी आता चिनी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इम्रान खान सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात मागील काही दिवसांत चिनी नागरिकांवर प्राणघातक हल्ले झाले. आतापर्यंत ग्वादर बंदरात सीपीईसी योजनेंंतर्गत तयार होत असलेल्या चिनी नाविक तळ आणि डीप सी पोर्टला विरोध करण्यासाठी बलुच बंडखोरांनी आता थेट चिनी नागरिकांनाच आपल्या हल्ल्याचे लक्ष्य केले आहे.
सामरिकदृष्ट्या बलुचिस्तान पाकिस्तानसाठी महत्त्वाचे आहे. अफगाणिस्तान आणि इराणसोबत या प्रांतांच्या सीमा जोडल्या गेल्या आहेत. ग्वादर बंदरदेखील बलुचिस्तान भागात येते. या बंदराचे नियंत्रण आता चीनकडे सोपविण्यात आले आहे. बलुच बंडखोरांना भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’कडून मदत मिळत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून सातत्याने होत असतो. भारताने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.