किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलढाका, ३० डिसेंबर – बांगलादेश नौदलाच्या पाच जहाजांमधून सुमारे १७०० रोहिंग्या मुस्लिमांचे एका बेटावर स्थलांतर करण्यात आले आहे. तीन तासांच्या समुद्री प्रवासानंतर रोहिंग्यांना बेटावर पोहोचविण्यात आले. तिथे त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
बांगलादेशात रोहिंग्यांसाठी असलेल्या छावण्यांमधून त्यांना बसने सोमवारी चितगाव येथे आणण्यात आले. कॉक्स बाझार येथूनही काही रोहिंग्या आले. मंगळवारी जहाजांमधून ते बेटाकडे रवाना झाले, असे सूत्रांनी सांगितले.
स्थलांतरासाठी रोहिंग्यांवर कोणतीही जबरदस्ती करण्यात आलेली नाही. मानवी हक्क कार्यकर्त्यांनी रोहिंग्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा वारंवार उपस्थित केला होता. त्यानंतर बांगलादेश सरकारकडून हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. काही संघटनांच्या मते, रोहिंग्यांना बळजबरीने ३४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बेटावर ठेवणे अयोग्य आहे. या बेटावर कोणत्या स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध होतील, तेथील वातावरण कसे असेल, हे सरकारने जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली होती.
रोहिंग्यांसाठी नियोजित केलेले बेट २० वर्षांपूर्वी बांगलादेशने विकसित केले आहे. या बेटावर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो; तसेच अनेक भागात पूरही येतो. या बेटावर काही घरे, रुग्णालये, मशिदी आहेत.