किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमानवनिर्मित कचर्याची अंतराळातही घाण,
न्यू यॉर्क, २८ नोव्हेंबर – सूर्यमालेतील शनी या ग्रहाबाबत सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल आहे. शनिभोवती असलेले गोल कडे या ग्रहाबाबतची उत्सूकता आणखीच वाढवते. आता पृथ्वीभोवतीही शनी ग्रहाप्रमाणे एक कडे निर्माण होणार असल्याची भीती शास्त्रज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. हे कडे शनी ग्रहाप्रमाणे नैसर्गिक नसेल तर, ते अंतराळातील मानवनिर्मित कचर्यामुळे निर्माण होणार आहे. मानवाने विविध कारणासाठी अंतराळात पाठवलेले उपग्रह, इतर वस्तू यामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होत आहे. या कचर्यामुळे काही काळाने पृथ्वीभोवती एक कडे निर्माण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
रशियाने नुकतेच एका उपग्रहभेदी क्षेपणास्त्राचे परीक्षण केले. त्यामुळे अंतराळात उपग्रहाचा कचरा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. नासा आणि अमेरिकी सरकारने अशी चाचणी घेऊन अंतराळातील समस्या अधिकच गंभीर केल्याचा आरोप आहे. या चाचणीमुळे पृथ्वीच्या कक्षेत हजारो लहान लहान तुकडे तयार झाले होते. अशा प्रकारचे तुकडे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानके आणि अन्य उपग्रहांच्या भूस्थिर कक्षेत कचर्याची समस्या वाढवत आहेत. त्यामुळे या स्थानकावरील अमेरिकी, रशियन आणि चिनी अंतराळवीरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अंतराळातील हा कचरा कमी करण्यासाठी संशोधकांकडून उपाय शोधले जात आहेत.
संशोधकांनी दिला चुंबकाचा पर्याय
‘नेचर’मध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार संशोधकांनी त्यासाठी एक पर्याय सुचवला होता. त्यांनी चुंबकाच्या माध्यमातून अंतराळातील कचरा कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यासाठी रोबोटचा वापर करण्याचाही विचार सुरू होता. मात्र, फिरणारा हा कचरा गोळा करताना कचर्याच्या तुकड्यांमध्ये रोबोटचे हात तोडण्याची क्षमता आहे. त्यामुळे या माध्यमातून अजूनच कचरा जमा होईल. रोबोटपेक्षा चुंबकाद्वारे कचरा स्वच्छ करणे व्यावहारिक ठरेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.