किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकेपटाऊन, २ डिसेंबर – ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि कोरोना विषाणूचा अभ्यास करणार्या तज्ज्ञांच्या मतानुसार ओमिक्रॉनचा व्हेरिएंट जास्त तीव्रतेचा नाही. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनची तीव्रता मंदावली असून, गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणार्या मृत्युदरात घसरण झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेतील काही वृत्तांनुसार ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टापेक्षा जास्त प्राणघातक नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने आज गुरुवारी दिली. ओमिक्रॉनमुळे आफ्रिकेत आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. याच पृष्ठभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध मागे घेण्यास हरकत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या भीतीने दक्षिण आफ्रिकी देशांतून येणार्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. परंतु, ओमिक्रॉनची तीव्रता जास्त नसल्याने दक्षिण आफ्रिकी देशांच्या प्रवासावर निर्बंध घालू नये, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपमधील प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी डॉ. कॅथरीन स्मॉलवूड यांनी व्यक्त केले.
दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालये आणि डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉनच्या बाधितांमध्ये तीव्र डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे दिसत आहेत. परंतु, ही लक्षणे गंभीर नसून, ती अतिशय सौम्य आहेत. दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या वृत्तांमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच ब्रिटन, अमेरिका युरोपियन युनियन, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांनी दक्षिण आफ्रिकी देशांतून येणार्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री जो फाहला यांनी सांगितले की, आमच्याकडील डॉक्टरांच्या पाहण्यात आलेल्या बाधितांमध्येे आढळलेली लक्षणे जास्त गंभीर नाहीत. अद्याप गंभीर लक्षणे असलेला बाधित डॉक्टरांना आढळलेला नाही.
ओमिक्रॉन धोकादायक नाही ः डॉ. अँजेलिक कोएत्झी
दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंट हा जास्त धोकादायक नसून, त्याची लक्षणेही तीव्र नाहीत. परंतु, काही देशांनी विनाकारण अपप्रचार करून भीती निर्माण केली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटला घाबरण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.