किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलकोलंबो, ३ डिसेंबर – भारताच्या तीव्र विरोधानंतर चीनने श्रीलंकेत उभारल्या जाणार्या ‘हायब्रिड एनर्जी सिस्टम’ योजनेच्या निर्माणाचे सुरू केलेले काम थांबवले आहे. ही हायब्रिड एनर्जी सिस्टिम उत्तर भागातील तीन बेटांवर उभारली जाणार होती, हा भाग तामिळनाडूच्या अगदी जवळ आहे.
जानेवारी महिन्यात भारताने श्रीलंकेकडून एका चिनी कंपनीला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट सोपवल्याबद्दल निषेध नोंदवला होता. श्रीलंकेने नुकतेच कोलंबो बंदरातील ‘ईस्ट कंटेनर डेपो’च्या बांधकामाचे कंत्राट एका चिनी कंपनीला दिले आहे.
हा कंटेनर डेपो बांधण्याचे कंत्राट श्रीलंकेकडून यापूर्वी भारत आणि जपानला देण्यात आले होते. श्रीलंकेतील चीनच्या दूतावासाने केलेल्या ट्विटनुसार, तिसर्या देशाकडून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर उत्तरेकडील बेटांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, ‘तिसरा देश’ म्हणताना चीनने भारताचा उल्लेख टाळला. याच कंपनीने मालदीवमध्येही कंत्राट मिळवल्याचा उल्लेख चिनी दूतावासाने आपल्या ट्विटमध्ये केला आहे.
तिसर्या पक्षाने उपस्थित केलेल्या सुरक्षेच्या चिंतेच्या कारणास्तव ‘सिनो सोर हायब्रिड टेक्नॉलॉजी’ने हायब्रिड ऊर्जा प्रणाली तयार करण्यासाठी उत्तर बेटांवर सुरू करण्यात आलेले काम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याच कंपनीने मागील महिन्यात मालदीवसोबत बेटांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला, असे चिनी दूतावासाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी, श्रीलंकेने निकृष्ट दर्जाचे कारण देत चीनकडून २० हजार टन सेंद्रिय खतांची पहिली खेप स्वीकारण्यास नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या चीनने श्रीलंकेतील एका बँकेला काळ्या यादीत टाकले होते. नंतर श्रीलंकेने चीनऐवजी भारताकडून सेंद्रीय खतांचा करार केला होता. भारताकडूनही श्रीलंकेला तत्काळ खतांचा पुरवठा करण्यात आला.