किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलजगभरातील इंटरनेट यंत्रणा पडेल ठप्प,
कॅलिफोर्निया, ३ ऑक्टोबर –
भविष्यात असे सौर वादळ येऊ शकते, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या काही भागात इंटरनेट ठप्प किंवा बंद पडू शकते. असे झाल्यास विविध देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल आणि अनेक देश पूर्णपणे गरीब होतील. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक संगीता अब्दू ज्योती यांनी हा इशारा दिला आहे.
इन्स्टा बंपरच्या अहवालानुसार, भारतीय वंशाच्या संशोधक संगीता अब्दू ज्योती यांनी सौर वादळांचा अभ्यास केला आहे. त्यांनी संशोधनात म्हटले आहे की, भविष्यात असे भयानक सौर वादळ येईल. ज्यामुळे इंटरनेट प्रलय होऊ शकतो. म्हणजेच संपूर्ण जगाचे इंटरनेट बंद होऊ शकते.
या सौर वादळाचा परिणाम महासागरांमध्ये पसरलेल्या इंटरनेट केबलवर होऊ शकतो. या केबल्स जगातील विविध देशांना जोडतात. या सागरी केबल्समध्ये रिपीटर्स बसवले जातात जेणेकरून इंटरनेट प्रवाह कायम राहील.
ते सौर वादळांना अत्यंत संवेदनशील असतात. सौर वादळ येते तेव्हा या रिपीटर्सची स्थिती बिघडू शकते. ते निकामीही होऊ शकतात. अशा परिस्थितीत, केबलमधील करंट बंद होताच जगभरातील इंटरनेट नेटवर्क ऑफलाईन होईल. त्याचा प्रभाव फायबर ऑप्टिकलशी जोडलेल्या देशांच्या अंतर्गत इंटरनेटपर्यंत पोहोचू शकतो आणि ते ठप्प पडू शकते.
जेव्हा सौर वादळे येतात तेव्हा ते विद्युत ग्रीडचे नुकसान करतात. यामुळे मोठ्या भागात अंधार होतो. त्यांचा इंटरनेट प्रणालीवरही परिणाम होतो. इंटरनेट बंद झाल्यामुळे अर्थव्यवस्था, दळणवळण व्यवस्था, संरक्षण, दूरसंचार यासारख्या क्षेत्रांची चाके थांबू शकतात. यामुळे त्या देशांची अर्थव्यवस्था कोसळू शकेल. यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणेही कठीण होईल.
नुकसानीचा अंदाज लावू शकत नाही
संशोधक संगीता ज्योती सांगतात की सर्वांत मोठी भीती ही आहे की, आपल्याकडे सौर वादळे आणि त्यांच्या प्रभावांबद्दल खूप कमी डेटा आहे. त्यामुळे नुकसान किती मोठे होईल याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. जगातील सर्वांत गंभीर सौर वादळे १८५९, १९२१ आणि १९८९ मध्ये आली. यामुळे अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. ग्रीड बंद पडले होते. अनेक राज्ये अनेक तास अंधारात होती.
ज्योती सांगतात की, ही चिंतेची बाब म्हणजे, जगातील कोणत्याही शास्त्रज्ञाकडे सौर वादळांचे परिणाम मोजण्यासाठी किंवा अंदाज लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. आपत्तीजनक सौर वादळ आपल्या पॉवर ग्रीड, इंटरनेट यंत्रणा, दिशादर्शक यंत्रणा आणि उपग्रहांवर परिणाम करेल की नाही हे आम्हाला माहीत नाही.