किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलगृहविलगीकरणासह कोव्हिशिल्डलाही मान्यता,
सिडनी, १ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलियाच्या सीमा जगासाठी पुन्हा एकदा खुल्या करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर ऑस्ट्रेलियाने परदेशी नागरिकांसाठी आपल्या सीमा बंद केल्या होत्या. आता पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्याच्या आणि निर्बंध कमी करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय सीमा पुन्हा उघडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, भारतनिर्मित कोव्हिशिल्ड लसीलाही ऑस्ट्रेलियाने मान्यता दिली आहे.
पंतप्रधान मॉरिसन यांनी सांगितले की, ज्या राज्यात लसीकरणाचे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले आहे, तेथील आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या केल्या जातील.त्याची सुरुवात न्यू साऊथ वेल्स राज्यापासून होणार आहे.
ऑस्ट्रेलियात आता पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांव्यतिरिक्त इतर परदेशी नागरिकांना एक आठवड्याच्या गृहविलगीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. याआधी ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर हॉटेलमध्ये १५ दिवसांचा विलगीकरणाचा काळ पूर्ण करावा लागत होता. याशिवाय कोरोना लसीच्या दोन मात्रा घेतलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना कमर्शिअल फ्लाईटमधून प्रवास करण्याची परवानगीही देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियात सध्या फायझर, ऍस्ट्राझेनेका, मॉर्डना आणि जॉन्सन ऍण्ड जॉन्सन याच लसींना मान्यता होती. त्यामुळे भारतातून ऑस्ट्रेलियात जाणार्यांची बरीच अडचण होत होती. कारण, भारतात कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुटनिक व्ही याच लसी दिल्या जात आहे. यापैकी एकाही लसीला ऑस्ट्रेलियात मान्यता नव्हती. आता मात्र कोव्हिशिल्डला मान्यता देण्यात यावी, असा सल्ला ऑस्ट्रेलियाच्या थेरपी गूड्स ऍडमिनिस्ट्रेशनने दिला आहे. त्यामुळे याही लसीला ऑस्ट्रेलियात मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.