किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलभारताने चीनला ठणकावले,
दुशांबे, १७ सप्टेंबर – भारत-चीनदरम्यान कोणत्याही द्विपक्षीय मुद्यावर चर्चेआधी लडाख सीमेवर उभे असलेले चिनी सैनिक माघारी बोलवा. तोपर्यंत कोणत्याही मुद्यावर चर्चा पुढे जाऊ शकत नाही आणि या द्विपक्षीय संबंधांमध्ये अन्य त्रयस्थ देशाचा दृष्टिकोनही स्वीकारला जाणार नाही, अशा शब्दांत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी चिनी विदेशमंत्र्यांना ठणकावले.
दुशांबे येथे शांघाय सहकार्य परिषदेच्या शिखर संमेलनासाठी दोन्ही देशांचे विदेशमंत्री हजर झाले. त्यांनी एका बैठकीत आशिया क्षेत्रातील वर्तमान स्थितीवर चर्चा केली तसेच अनेक मुद्यांवर चर्चेसाठी दोन्हीकडील सैन्य तसेच मुत्सद्दी अधिकार्यांची भेट होणे गरजेचे आहे, यावर सहमती दर्शवली.
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी चिनी विदेशमंत्री वांग यी यांना असे स्पष्ट केले की, भारताने दोन संस्कृतींमधील संघर्षाचे कधीच समर्थन केले नाही. दोन्ही देशांनी परस्परांना गुण-दोषांसकट स्वीकारून पुढे जावे लागणार आहे. भारत आणि चीनमधील संबंध सौहार्दपूर्ण राहिले तर आशिया क्षेत्रात ते मैत्रीचा नवा आदर्श प्रस्थापित करू शकतात. मात्र, त्यासाठी दोन्ही देशांमधील काही प्रलंबित मुद्यांना निकालात काढणे गरजेचे आहे. लडाखमध्ये असणारे सैन्य चीनने माघारी बोलावले पाहिजे. यापूर्वी १४ जुलै रोजी दोन्ही देशांचे प्रतिनिधी भेटले होते. तेव्हापासून आतापर्यंत लडाखमधील स्थितीवर कोणताही समाधानकारक तोडगा काढण्यात आलेला नाही. आता त्यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न व्हायला हवे. सध्या जी स्थिती आहे ती दोन्ही देशांच्या संबंधांसाठी फारशी चांगली नाही. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर भारताकडे चीनने इतर कोणत्या देशाच्या दृष्टिकोनातून पाहू नये. हा इतर कोणता देश असा उल्लेख म्हणजे नेमका कोणाला उद्देशून होता, हे मात्र विदेश मंत्रालयाच्या वक्तव्यात स्पष्ट करण्यात आलेले नाही.