किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसिडनी, १८ सप्टेंबर – चीनच्या दादागिरीमुळे या देशासोबत युद्ध होऊ शकते, अशी कबुली ऑस्ट्रेलियाने दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डटॉन म्हणाले की, चीन ज्या प्रकारचा दृष्टिकोन अवलंबत आहे, त्यामुळे युद्धाची भीती अधिक गडद झाली आहे. चीन या युद्धात अण्वस्त्रांचा वापर करू शकतो आणि ब्रिटनलाही त्यात ओढू शकतो. ऑस्ट्रेलियाने युद्धाची तयारी सुरू करावी.
अमेरिका आणि ब्रिटनसोबत लष्करी करार केल्यावर ऑस्ट्रेलियाने चीनशी युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डटॉन यांनी मान्य केले आहे की, चीनसोबत तैवानवरून युद्ध होण्याची प्रबळ शक्यता आहे. अनेक चिनी पाणबुड्या प्रशांत महासागरात गस्त घालत आहेत. अशा परिस्थितीत या पाणबुड्या ऑस्ट्रेलियाला अण्वस्त्र हल्ल्याचे लक्ष्य बनवू शकतात.
पीटर डटॉन ऑकस कराराच्या संदर्भात अमेरिकेत आहेत. ते म्हणाले की, नवीन युती ऑस्ट्रेलियाला किमान आठ आण्विक पाणबुड्या आणि इतर प्रगत लष्करी तंत्रज्ञान देईल. प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी हा करार आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, चीन शांततेऐवजी युद्धाची परिस्थिती निर्माण करू शकेल, अशी भीती होती. तैवानच्या बाबतीत चीनची भूमिका स्पष्ट आहे. यामुद्यावर अमेरिकेची भूमिकादेखील स्पष्ट आहे. संघर्ष कुणालाचाच नको आहे.
दरम्यान, दक्षिण चीन समुद्राच्या लढाईत ब्रिटनला ओढण्याच्या भीतीमुळे बोरिस जॉन्सनने संसदेत ऑकस करारामध्ये सहभागी होण्याचा बचाव केला. पंतप्रधान म्हणाले की, ब्रिटन आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संरक्षणासाठी कटीबद्ध आहे आणि त्यानुसार कार्य करेल. दरम्यान, चीनच्या विमानांनी पुन्हा एकदा तैवान सीमेवर घुसखोरी केली. तैवानने सांगितले की आठ चिनी लढाऊ विमाने आणि दोन सहाय्यक विमाने त्याच्या हद्दीत घुसली. चीनच्या या कृत्यांमुळे या प्रदेशातील तणाव वाढत आहे.
ऑकसअंतर्गत अमेरिका आणि ब्रिटनच्या मदतीने ऑस्ट्रेलिया अणुऊर्जेवर चालणार्या पाणबुड्यांचा ताफा तयार करेल, ज्याचा उद्देश भारत-प्रशांत प्रदेशात स्थिरता वाढवणे आहे. या कराराची माहिती समोर आल्यापासून चीन संतापला आहे. हा करार प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी घातक असल्याचा दावा चीनने केला आहे. तीन देश शीतयुद्धाच्या मानसिकतेने काम करीत आहेत. यामुळे अण्वस्त्रांची स्पर्धा वाढू शकते आणि अप्रसार न करण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना हानी पोहोचू शकते, असेही चीनने म्हटले आहे.
फ्रान्सने माघारी बोलवला अमेरिकेतील राजदूत
अमेरिका-ऑस्ट्रेलिया-ब्रिटनमध्ये झालेल्या ऑकस करारावरून भडकलेल्या फ्रान्सने अमेरिकेतील राजदूतास शुक्रवारी माघारी बोलवले आहे. अठराव्या शतकात फ्रान्सची अमेरिकेसोबत झालेली मैत्री आता अमेरिका-ऑस्ट्रेलिया-ब्रिटनमध्ये भारत-प्रशांतमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत ऑकस करारावरून धोक्यात आली आहे.