किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलगैरव्यवहार झाल्याचा आरोप,
मॉस्को, २० सप्टेंबर – रशियात झालेल्या संसदीय निवडणुकीच्या सुरुवातीच्या निकालानुसार राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या युनायटेड रशिया या पक्षाचा बहुमताने विजय झाला आहे. विरोधी पक्ष असलेल्या रशियन कम्युनिस्ट पक्षाची कामगिरी सुधारली आहे. या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांसह निवडणूक निरीक्षकांनी केला आहे.
रशियाच्या निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जवळपास ५५ टक्के मतांची मोजणी झाली असून, त्यात युनायटेड रशियाला ४५ टक्के व विरोधी कम्युनिस्ट पक्षाला २२ टक्के मते मिळाली आहेत. पुतिन यांच्या पक्षाने या निवडणुकीत विजय मिळवला असला, तरी २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या कामगिरीत घसरण झाली असल्याचे म्हटले जात आहे.
या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ही निवडणूक देखावाच असल्याचे त्यांनी म्हटले. रशियात निष्पक्षपणे निवडणुका पार पडल्या असत्या, तर सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षाला मोठा फटका बसला असता असेही विरोधकांनी म्हटले.
सत्ताधारी पक्षाने बोगस मतदान, निवडणूक अधिकार्यांवर दबाव टाकणे, सुरक्षा व्यवस्था न पुरवणे आदी गैरप्रकार केले असल्याचा आरोप केला आहे.
रशियाची संसद ड्युमातील ४५० जागांसाठी तीन दिवस मतदान सुरू होते. निवडणूक आयोगाकडे ७५० हून तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करण्यात येणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.