किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलन्यूयॉर्क, १२ डिसेंबर – अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्यो बायडेन आणि नियोजित उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने पर्सन ऑफ द इयर २०२० म्हणून निवड केली आहे. दोन्ही नेत्यांनी अमेरिकेचे वर्तमान बदलले असल्याचे मत व्यक्त केले आहे.
दरवर्षी दिल्या जाणार्या प्रतिष्ठेच्या सन्मानासाठी कोरोना महामारी काळात सातत्याने सेवा देणारे आरोग्यसेवक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अँड इन्फे क्शिअस डीसीजेसचे संचालक डॉ. अँथनी फाऊसी, वंशभेदांविरोधात न्याय मिळविण्यासाठी सुरू असलेली चळवळ आणि अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अंतिम यादीत होते. ट्रम्प यांनी मागील चार वर्षांमध्ये विघटन आणि विभाजनाला बळ दिले, तर बायडेन आणि हॅरिस यांनी बदलता वर्तमान दाखवून दिला. अमेरिका टिकू न राहायची असेल तर वैविध्याचा धागा, जगण्याचे वेगवेगळे अनुभव आणि जागतिक दृष्टिकोन आदींची सरमिसळ आवश्यक आहे, असे टाइम प्रकाशनाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, डॉ. फाऊसी, आरोग्यसेवक आणि वांशिक भेदांविरोधातील चळवळ यांना गार्डियन्स ऑफ द इयर २०२० म्हणून जाहीर केले. झूमचे सीईओ एरिक युवान यांना टाइम्स बिझनेस पर्सन ऑफ द इयर, कोरियाचा तरुणांमधील लोकप्रिय बँड बीटीएसला एंटरटेनर ऑय द इयर, तर अमेरिकी बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स याला ऍथलिट ऑफ द इयर म्हणून घोषित केले.
भारतीय राहुल दुबे सन्मानित
दरम्यान, राहुल दुबे यांनाही टाइम हिरोज ऑफच्या यादीत स्थान मिळाले आहे. कृष्णवर्णीय नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर झालेल्या निदर्शनांच्या काळात दुबे यांनी वॉशिंग्टनमधील राहत्या घरी ७० आंदोलकांना आश्रय दिला होता. आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन काम केल्याबद्दल दुबे यांचा गौरव केला जात असल्याचे टाइमने म्हटले आहे.