किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलइस्लामाबाद, ११ डिसेंबर – मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील काही सूत्रधारांना पाकिस्तानमधील इम्रान खान यांचे सरकार विशेष मानधन देणार आहे. धक्कादायक म्हणजे, याबाबतच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही मंजुरी दिली असल्याची माहिती आहे.
फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या काळ्या यादीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पाकिस्तान एकीकडे अतिरेकी नेत्यांविरोधात कारवाई करण्याचा देखावा निर्माण करीत आहे आणि दुसरीकडे त्यांना उघडपणे पाठिंबाही देत असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झकिऊर रेहमान लखवी अतिशय आजारी असल्याचे कारण इम्रान सरकारने सुरक्षा परिषदेला सांगितले आहे. त्याला जेवण, औषध आणि न्यायालयीन खटल्यांमध्ये वकिलांवर होणार्या खर्चासाठी दरमहा एक विशिष्ट रक्कम मानधन म्हणून देण्याचा प्रस्ताव सरकारने सुरक्षा परिषदेकडे पाठविला होता आणि तो मंजूरही झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लखवीला दरमहा भोजन खर्चासाठी ५० हजार, औषधांसाठी ४५ हजार, सार्वजनिक खर्चासाठी २० हजार आणि प्रवासासाठी १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. लखवीवर दहशतवादप्रकरणी अनेक खटले सुरू आहेत. या खटल्यांमधील वकिलांचा खर्चही सरकारी तिजोरीतून होणार आहे.
वकिलांच्या शुल्कासाठी त्याला दरमहा २० हजार रुपये मिळतील. आर्थिक मदतीसाठी वेगवेगळ्या देशांकडे भीक मागणारे इम्रान खान सरकार लखवीला दर महिन्याला एकूण दीड लाख रुपये देणार आहे, असे या सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने लखवीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे.
लादेनच्या मित्राला मिळणार मदत
पाकिस्तान सरकारने लखवीप्रमाणेच आणखी एक अतिरेकी मेहमूद सुल्तान बशीरुद्दिनला मासिक खर्च देण्यासाठी सुरक्षा परिषदेची परवानगी मिळविली आहे. मेहमूद हा पाकिस्तानचा अणुशास्त्रज्ञ होता. त्यानंतर त्याने अफगाणिस्तानात जाऊन ओसामा बिन लादेनची भेट घेतली. मेहमूदने स्वत:ची दहशतवादी संघटना स्थापन केली. त्या संघटनेवर संयुक्त राष्ट्राने बंदी घातली आहे. पाकिस्तान सरकार त्यालाही दरमहा दीड लाख रुपयांची मदत करणार आहे.