किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादललंडन, १० डिसेंबर – कोरोना लसीकरण मोहीम सुरू केल्यानंतर २४ तासांमध्ये दुष्परिणाम जाणवल्याने ब्रिटन सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य सेवेने तातडीने दक्षतेचा इशारा जारी केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये मंगळवारपासून लसीकरण सुरू करण्यात आले असून, फायझर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात येत आहे. मात्र, यात दोघांची प्रकृती बिघडल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या (एनएचएस) सूत्रानुसार, लसीसंबंधीचे दुष्परिणाम ऍलर्जीमुळे झाले आहेत. आरोग्य विभागाने सूचना जारी करीत लस, औषध अथवा इतर प्रकारची ऍलर्जी असल्यास संबंधिताने फायझरची लस घेता कामा नये. लसीकरण सुरू असलेल्या रुग्णालयांमध्ये ही सूचना देण्यात आली आहे. दरम्यान, देशात गंभीर स्वरुपाची ऍलर्जी असलेल्या नागरिकांची ठोस आकडेवारी नाही. मात्र, सुमारे ७० लाख लोकांना खाद्यपदार्थ, लस आणि औषध आदींची समस्या असू शकते, अशी शंका असल्याने आरोग्य विभागाने उपस्थित केली आहे.